Lokrakshanay
Tuesday, September 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘३७० बिर्याणी’ वादानंतर प्रणित मोरेचे पुनरागमन; नव्या स्टँड-अप स्पेशलवरून सोशल मीडियात चर्चा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 6, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
‘३७० बिर्याणी’ वादानंतर प्रणित मोरेचे पुनरागमन; नव्या स्टँड-अप स्पेशलवरून सोशल मीडियात चर्चा
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा एकदा चर्चेत आला असून, यावेळी कारण कोणताही नवा वाद नसून त्याच्या पुनरागमनाची घोषणा आहे. ‘३७० बिर्याणी’ वादानंतर काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिलेल्या प्रणितने आता ‘घायल’ या नव्या स्टँड-अप स्पेशलची घोषणा केली आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या शोचे पोस्टर शेअर करत त्याने, “जे घडलं ते मी बदलू शकत नाही, पण त्यामुळे मी कसा माणूस बनतो हे माझ्या हातात आहे. ‘घायल’ ही त्याच प्रवासाची कहाणी आहे. याची सुरुवात मुंबईतून होते,” असे लिहिले. या पोस्टनंतर चाहत्यांसह सोशल मीडियावरील अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्याच्या पुनरागमनाचे स्वागत केले, तर काहींनी त्याच्या नव्या शोची तुलना प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाच्या ‘Still Alive’ या कमबॅक शोशी करत टीका केली. “तू समय रैना नाहीस, त्याची नक्कल करू नकोस,” अशा प्रतिक्रिया काही वापरकर्त्यांनी नोंदवल्या. मात्र, अनेकांनी दोन्ही कलाकारांच्या परिस्थिती वेगळ्या असल्याचे सांगत अशा तुलनेला विरोधही केला.

ट्रोलिंगदरम्यान प्रणितच्या चाहत्यांनी त्याला मोठा पाठिंबा दिला. “भाऊ, तुमची खूप आठवण आली,” “किंग पुन्हा मनोरंजनासाठी परतला आहे,” अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी त्याच्या नव्या स्टँड-अप स्पेशलला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, जून २०२६ मध्ये गुरुग्राम येथे झालेल्या एका स्टँड-अप शोदरम्यान ‘क्राउडवर्क’ सत्रात एका प्रेक्षकाने डेटदरम्यान ३७० रुपयांच्या बिर्याणीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रणित हसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर संमती आणि महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील मुद्द्यांवर मोठा वाद निर्माण झाला होता. वाढत्या टीकेनंतर प्रणित मोरेने सार्वजनिक माफी मागत त्या क्षणी संबंधित प्रेक्षकाला थांबवायला हवे होते, अशी कबुली दिली होती. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली होती आणि संबंधित यंत्रणांकडून गुन्हाही नोंदविण्यात आला होता. आता ‘घायल’ या नव्या स्टँड-अप स्पेशलद्वारे प्रणित मोरे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत असून, त्याच्या पुनरागमनाकडे मनोरंजन विश्वासह चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

घरगुती गॅसवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार; सिलिंडर थेट १८ रुपयांनी महागणार!

Next Post

डोंबिवलीत रिक्षा मिळत नसल्याने नागरिक रस्त्यावर; केळकर रोडवर प्रवाशांचे ठिय्या आंदोलन सुरू

Next Post
डोंबिवलीत रिक्षा मिळत नसल्याने नागरिक रस्त्यावर; केळकर रोडवर प्रवाशांचे ठिय्या आंदोलन सुरू

डोंबिवलीत रिक्षा मिळत नसल्याने नागरिक रस्त्यावर; केळकर रोडवर प्रवाशांचे ठिय्या आंदोलन सुरू

BreakingNews

आता रिक्षात बसण्यापूर्वीच कळणार भाडे; ठाणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवेला सुरुवात!

राजा शिवछत्रपती मंडळाचा ‘माऊली… एक दिव्य प्रवास’ देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची भररस्त्यात चाकूने हत्या; मुख्य सूत्रधारासह ७ आरोपींना अटक

उल्हास नदीला मिळाले ‘जीवनदान’; गणेशोत्सवात तब्बल २,०७० किलो निर्माल्य संकलित!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.