Lokrakshanay
Tuesday, September 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

डोंबिवलीत रिक्षा मिळत नसल्याने नागरिक रस्त्यावर; केळकर रोडवर प्रवाशांचे ठिय्या आंदोलन सुरू

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 6, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
डोंबिवलीत रिक्षा मिळत नसल्याने नागरिक रस्त्यावर; केळकर रोडवर प्रवाशांचे ठिय्या आंदोलन सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील केळकर-पाटकर रस्ता रिक्षा वाहनतळावर संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी रिक्षाचालकांकडून प्रवाशांना भाडे नाकारले जात असल्याच्या आरोपामुळे बुधवारी रात्री प्रवाशांचा संताप अनावर झाला. कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना रिक्षा मिळत नसल्याने संतप्त प्रवाशांनी केळकर रस्त्यावरील रिक्षा वाहनतळावर तब्बल अडीच तास ठिय्या आंदोलन करत रिक्षांची वाहतूक रोखून धरली. रिक्षा वाहनतळावर नियमितपणे रिक्षा उपलब्ध करून देण्यात याव्यात, तसेच चालकांनी प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत नेण्याची हमी द्यावी, अन्यथा आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. याशिवाय वाहनतळावर रिक्षा उपलब्ध होत नसल्यास केडीएमटीने या परिसरात बससेवा सुरू करावी आणि सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणीही प्रवाशांनी केली. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, मागील काही दिवसांपासून संध्याकाळी सातनंतर केळकर रस्ता रिक्षा वाहनतळावर एकही रिक्षा उभी राहत नाही. विशेषतः पावसाच्या दिवसांत रिक्षाचालक या परिसरात येण्याचे टाळतात. दिवसभर शेअर रिक्षा चालवणारे अनेक चालक संध्याकाळी वाहनतळ सोडून जवळच्या चौकांमध्ये किंवा रस्त्यांवर थांबून जास्त भाड्याच्या प्रवाशांची वाट पाहतात. वाहनतळावर उभे राहिल्यास शेअर पद्धतीने कमी भाड्यात प्रवासी न्यावे लागतात, तर थेट भाड्यात अधिक पैसे मिळत असल्याने नियमित प्रवाशांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या आंदोलनात सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे यांनीही प्रवाशांच्या तक्रारींना दुजोरा देत, रिक्षाचालकांकडून जवळचे भाडे नाकारले जात असल्याचे सांगितले. रिक्षाचालक वाहनतळाच्या बाजूने रिकाम्या रिक्षा घेऊन जात असले तरी प्रवासी घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रवासी नाकारणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक विभागाला असतानाही संबंधितांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची टीका त्यांनी केली. यासंदर्भात पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती देत, संध्याकाळच्या वेळेत जास्त भाडे मिळविण्याच्या स्पर्धेमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Previous Post

‘३७० बिर्याणी’ वादानंतर प्रणित मोरेचे पुनरागमन; नव्या स्टँड-अप स्पेशलवरून सोशल मीडियात चर्चा

Next Post

१५ ऑगस्टच्या भाषणात तरुणांच्या प्रश्नांवर बोला; अभिजीत दीपके यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Next Post
१५ ऑगस्टच्या भाषणात तरुणांच्या प्रश्नांवर बोला; अभिजीत दीपके यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

१५ ऑगस्टच्या भाषणात तरुणांच्या प्रश्नांवर बोला; अभिजीत दीपके यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

BreakingNews

आता रिक्षात बसण्यापूर्वीच कळणार भाडे; ठाणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवेला सुरुवात!

राजा शिवछत्रपती मंडळाचा ‘माऊली… एक दिव्य प्रवास’ देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची भररस्त्यात चाकूने हत्या; मुख्य सूत्रधारासह ७ आरोपींना अटक

उल्हास नदीला मिळाले ‘जीवनदान’; गणेशोत्सवात तब्बल २,०७० किलो निर्माल्य संकलित!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.