Lokrakshanay
Saturday, September 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

ममता गटाला 'फुटबॉल' तर विरोधी गटाला 'लिफाफा' चिन्ह मंजूर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 19, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्याने निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ ‘जोरा फूल’ (फुले आणि गवत) हे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. त्यानंतर आयोगाने दोन्ही गटांना स्वतंत्र नावे आणि तात्पुरती निवडणूक चिन्हे दिली आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉलपटू’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तर अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘लिफाफा’ हे चिन्ह देण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेझिनगर तसेच आसाममधील नागाव पोटनिवडणुकांमध्ये दोन्ही गटांकडून मूळ पक्षाच्या नावावर उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला. ही व्यवस्था अंतरिम असून पक्षाचे मूळ नाव आणि चिन्हाबाबत अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

दरम्यान, आयोगाच्या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले. त्यांनी हा निर्णय पक्षपाती आणि असंवैधानिक असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही निवडणूक आयोगावर टीका करत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता तृणमूल काँग्रेसचेही पक्षचिन्ह हिरावले गेल्याचा दावा केला. नंदीग्राममध्ये ममता गटाने काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर जुन्या हत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली, यावरूनही राजकीय वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात २२ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असून, या निकालाचा परिणाम शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह इतर पक्षांवरही होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

Previous Post

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

BreakingNews

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

१५ ऑक्टोबरपासून मुंबईतील पेट्रोल पंपांवर UPI बंद? MDR शुल्काविरोधात पेट्रोल डीलर्सचा आक्रमक इशारा

आयफोन १८ प्रो लाँचचा जल्लोष; नवीन मॉडेल खरेदीसाठी देशभरात ग्राहकांची झुंबड

अंधेरी मेट्रो स्थानकात लवकरच विश्रांतीसह मुक्काम; पर्यटकांच्या सोयीसाठी पॉड हॉटेल सज्ज

ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासनाचा पुढाकार; मातोश्री वृद्धाश्रमात जनजागृती अभियान

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.