Lokrakshanay
Friday, August 7, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

घरगुती गॅसवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार; सिलिंडर थेट १८ रुपयांनी महागणार!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 6, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, महाराष्ट्र
घरगुती गॅसवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार; सिलिंडर थेट १८ रुपयांनी महागणार!
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन संकट, पुरवठ्यातील अडथळे आणि ऊर्जा सुरक्षेची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकार देशात ४२ अब्ज डॉलरचा धोरणात्मक इंधन राखीव साठा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी एलपीजी आणि नैसर्गिक गॅस वापरणाऱ्या ग्राहकांवर छोटा अतिरिक्त कर लावण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कच्च्या तेलासोबतच प्रथमच एलपीजी आणि नैसर्गिक गॅसचाही देशाच्या धोरणात्मक इंधन साठ्यात समावेश केला जाईल. पेट्रोलियम मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार एलपीजीवर प्रति किलो १.२९ रुपये कर लावण्याचा विचार असून, त्यामुळे एका घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सुमारे १८ रुपयांची वाढ होऊ शकते. तसेच नैसर्गिक गॅसवर प्रति घनमीटर १.४३ रुपये कर प्रस्तावित करण्यात आला आहे. या कराच्या माध्यमातून सरकारला दरवर्षी सुमारे १.५ अब्ज डॉलरचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट असून, यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या गॅस बिलात सुमारे २ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्चे तेल आयात करणारा देश असून, देशाच्या सुमारे ९० टक्के इंधन गरजा आयातीवर अवलंबून आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष आणि ओर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. पुढील दहा वर्षांत पूर्ण होणाऱ्या या योजनेअंतर्गत २८ दशलक्ष मेट्रिक टन कच्चे तेल, ९ दशलक्ष टन एलपीजी आणि ४ दशलक्ष टन नैसर्गिक गॅस साठवण्याची क्षमता उभारण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताकडे सुमारे दोन महिन्यांचा कच्चे तेल व नैसर्गिक गॅसचा तसेच सहा आठवड्यांचा एलपीजीचा धोरणात्मक साठा उपलब्ध राहणार आहे. सध्या हा प्रस्ताव विविध मंत्रालयांमध्ये विचाराधीन असून, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Previous Post

गरजूंसाठी पारदर्शकपणे काम करा; निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

‘३७० बिर्याणी’ वादानंतर प्रणित मोरेचे पुनरागमन; नव्या स्टँड-अप स्पेशलवरून सोशल मीडियात चर्चा

Next Post
‘३७० बिर्याणी’ वादानंतर प्रणित मोरेचे पुनरागमन; नव्या स्टँड-अप स्पेशलवरून सोशल मीडियात चर्चा

'३७० बिर्याणी' वादानंतर प्रणित मोरेचे पुनरागमन; नव्या स्टँड-अप स्पेशलवरून सोशल मीडियात चर्चा

BreakingNews

डोंबिवलीत रिक्षा मिळत नसल्याने नागरिक रस्त्यावर; केळकर रोडवर प्रवाशांचे ठिय्या आंदोलन सुरू

‘३७० बिर्याणी’ वादानंतर प्रणित मोरेचे पुनरागमन; नव्या स्टँड-अप स्पेशलवरून सोशल मीडियात चर्चा

घरगुती गॅसवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार; सिलिंडर थेट १८ रुपयांनी महागणार!

गरजूंसाठी पारदर्शकपणे काम करा; निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

संकल्प संस्थेचे कार्य आता एका क्लिकवर; अधिकृत वेबसाईटचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

मेट्रो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.