Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती; शिक्षकांची नाराजी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 21, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती; शिक्षकांची नाराजी
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्याच्या सूचना देऊनही शाळांकडून अद्याप त्याचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्याच्या प्रणालीच्या वापराबाबत नव्याने सूचना देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. मात्र, आधीच अनेक प्रकारची माहिती भरण्याचे काम शिक्षकांना करावे लागत असताना आता ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्याचे नवे कामही शिक्षकांच्या माथी मारले जात असल्याबाबत शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी उपस्थितीची ऑनलाइन नोंद करण्याबाबत संयुक्त परिपत्रकाद्वारे निर्देश दिले. यापूर्वी केंद्र शासनाने विद्या समीक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या दैनिक उपस्थितीची नोंद करण्यासाठी प्रणाली कार्यान्वित केली आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर विद्यार्थी, शिक्षक नोंदणीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व शाळांतील शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर शालेय कामकाजाच्या दिवसाची उपस्थिती दररोज नोंदवावी. तसेच सर्व शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक यांनीही त्यांच्या उपस्थितीची नोंद या प्रणालीवर नियमितपणे करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर उपस्थिती नोंदवण्यासाठी स्वीफ्ट चॅट या ॲप्लिकेशनवर शाळेचा यू-डायस क्रमांक नोंदवून शाळेच्या माहितीची पडताळणी करून ती योग्य असल्याची खातरजमा करावी. वर्गशिक्षकांनी त्यांचा शालार्थ आयडी नोंदवून शालार्थ माहिती तपासून ती योग्य असल्याची खात्री करावी. विद्यार्थी उपस्थिती नोंदवण्यासाठी विद्यार्थी उपस्थिती टॅबद्वारे विद्यार्थी उपस्थिती, अनुपस्थिती चिन्हांकित करावी, उपस्थिती बरोबर असल्याची खातरजमा करून उपस्थिती दाखल करावी, एकापेक्षा जास्त इयत्तांना वर्गशिक्षक असल्यास दुसऱ्या इयत्तेची हजेरी चिन्हांकित करण्यासाठी विद्याथी हजेरी या टॅबवर त्या प्रमाणेच उपस्थितीची नोंद करावी.

Previous Post

डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो येणार मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

“मराठीत नामफलक लावा नाहीतर..” महापालिका शिक्षण विभागाचा शाळांना इशारा

Next Post
“मराठीत नामफलक लावा नाहीतर..” महापालिका शिक्षण विभागाचा शाळांना इशारा

“मराठीत नामफलक लावा नाहीतर..” महापालिका शिक्षण विभागाचा शाळांना इशारा

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.