Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! पदाधिका-यावर जीवघेणा हल्ला

मनसेचे ठाण्यातील नेते आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या १५ ते २० जणांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 2, 2024
in ताज्या बातम्या, पालघर
मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! पदाधिका-यावर जीवघेणा हल्ला
Share on FacebookShare on Whatsapp

पालघर : विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विधानसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य मिळालं नसल्याची तक्रार केल्याच्या काही तासातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे लोकसभा अध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मनसेचे ठाण्यातील नेते आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या १५ ते २० जणांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे पालघर व्यतिरिक्त उर्वरित पाच ठिकाणी उमेदवार दाखल केले होते. या उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य व आवश्यक सहकार्य न मिळाल्याने या सगळ्यांचा दारुण पराभव झाला होता. याबाबत अविनाश जाधव यांना वरिष्ठांकडून विचारणा केल्यानंतर त्यांनी ठाणे व पालघर जिल्हा पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

पालघरच्या स्थानीय नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपल्याविरुद्ध थेट तक्रार केल्याचा राग मनात धरून अविनाश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या १५ ते २० जणांनी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास समीर मोरे यांच्या तारापूर औद्योगिक वसाहतीच्या वेशीवर असणाऱ्या पाम गावातील कार्यालयात शिरून समीर मोरे यांना मारहाण केली तर त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अतिश मोरे यांना बोईसर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या हाताला आणि डोक्याला जखम झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली. समीर मोरे आणि त्यांच्या भावावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी पसरताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असून हा हल्ला अविनाश जाधव यांनी केलाच आरोप पालघर मधील मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. पालघर ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष भावेश चुरी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून आपण या घटनेची माहिती राज ठाकरे यांना देखील दिली असून ते आम्हाला न्याय देतील असा विश्वास चूरी यावेळी व्यक्त केला.

Previous Post

पुणे पोलीसांची बेपत्ता मुले-महिलांच्या शोधासाठी ऑपरेशन ‘मुस्कान मोहीम’ सुरू

Next Post

अनधिकृत विक्रेत्यांना दणका देत ६ कोटींची दंड वसूली ; रेल्वे प्रशासनाचे खाद्य सेवा सुधरवण्याकडे लक्ष

Next Post
अनधिकृत विक्रेत्यांना दणका देत ६ कोटींची दंड वसूली ; रेल्वे प्रशासनाचे खाद्य सेवा सुधरवण्याकडे लक्ष

अनधिकृत विक्रेत्यांना दणका देत ६ कोटींची दंड वसूली ; रेल्वे प्रशासनाचे खाद्य सेवा सुधरवण्याकडे लक्ष

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.