Lokrakshanay
Thursday, September 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home महाराष्ट्र

अनधिकृत विक्रेत्यांना दणका देत ६ कोटींची दंड वसूली ; रेल्वे प्रशासनाचे खाद्य सेवा सुधरवण्याकडे लक्ष

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 2, 2024
in महाराष्ट्र
अनधिकृत विक्रेत्यांना दणका देत ६ कोटींची दंड वसूली ; रेल्वे प्रशासनाचे खाद्य सेवा सुधरवण्याकडे लक्ष
Share on FacebookShare on Whatsapp

प्रवाशांच्या आरोग्याला नुकसान पोहोचवणाऱ्या रेल्वेतील अनधिकृत खाद्यविक्रेत्यांवर मध्य रेल्वे प्रशासनाने खास लक्ष ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या कित्येक महिन्यात रेल्वेने विविध ठिकाणी कारवाई करून अनेक वेंडरर्सना दणका दिला आहे. त्यांना मोठा दंडही ठोठावला आहे.
बल्लारशाह नागपूरमार्गे दिल्लीकडे निघालेल्या रेल्वेगाडीत खाद्यपदार्थ खाल्याने अनेक प्रवाशांना विषबाधा झाली होती. या प्रकरणाने केवळ नागपूर विभागातच नव्हे तर संपूर्ण रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर हे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या आणि त्याचे पार्सल तयार करून विकणाऱ्या बल्लारशाह रेल्वे स्थानकापासून ते नागपूर रेल्वे स्थानकापर्यंतच्या खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. दोषींवर कारवाईदेखील झाली. मात्र, थेट दिल्लीतूनच या संबंधाने कडक निर्देश मिळाल्याने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी रेल्वे गाड्या आणि रेल्वेस्थानकांवर अनधिकृतपणे खाण्यापिण्याचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाईचे धोरण तयार केले होते.
त्यानंतर ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर छापे मारण्यात आले. १४० खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे तपासण्या करण्यात आल्या. अनेक गाड्यांमधील खाद्यपदार्थांचे, चहा-कॉफीचे नमूने घेण्यात आले. दोषी आढळलेल्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून नोव्हेंबर २०२४ या एका महिन्यात ४९.०१ लाखांचा दंड वसूल केला. तर, एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ६ कोटी, ३९ लाख रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत कारवाई आणि दंडाचे प्रमाण १६.७७ टक्के जास्त आहे. या कारवाईच्या दणक्यामुळे रेल्वेतील अनधिकृत विक्रेत्यांची संख्या कमी होऊन प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध होण्याचा विश्वास अधिकाऱ्यांना आहे.
वेंडर व्यवस्थापन प्रणाली रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विकणारांनी शिरू नये म्हणून प्रशासनाने वेंडर व्यवस्थापन प्रणाली तयार केली आहे. त्यानुसार, नागपूर विभागातील खाद्यविक्रेत्यांसाठी ८३५ विक्रेत्यांना विशिष्ट ओळखपत्र देण्यात आले आहे. मोबाईल अँपवर या सर्वांना कनेक्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक किंवा गाड्यांमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ विकणारा व्यक्ती अधिकृत की अनधिकृत ते लगेच स्पष्ट होणार आहे.

Previous Post

मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! पदाधिका-यावर जीवघेणा हल्ला

Next Post

तीन कोटी रुपयांना सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक

Next Post
सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा ‘हा’ नवा प्रकार, ‘ऑनलाइन टास्क’पासून सावधान!

तीन कोटी रुपयांना सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक

BreakingNews

दहीहंडीत अश्लील नृत्यावर कारवाईचा इशारा; गणेशोत्सवात लेझर लाईटला बंदी, नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

गणेशोत्सवात भेसळमुक्तीचा ‘मुंढे पॅटर्न’; मुंबईतील व्यापारी आणि केटरर्सचा एफडीएला पूर्ण पाठिंबा

प्रसाद लाडांनी पाजले पाणी, पण जरांगेंची भूमिका कायम; गॅझेटच्या अध्यादेशाशिवाय माघार नाही!

वरळी कोळीवाडा आणि किनाऱ्यावरून दोन दिवसांत उपसला ५० टन कचरा!

नेपाळमधील महापुरातून आलेल्या माशांचे सेवन पडू शकते जीवावर!

मुंबईतील दोन प्रसिद्ध हॉटेलांचे परवाने निलंबित; अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि मुदतविना अन्नसाठा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.