Lokrakshanay
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 20, 2026
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास सोपा आणि वाहतूककोंडीमुक्त करण्यासाठी शहरात दोन कोस्टल रोड उभारले जाणार आहेत. यापैकी एक म्हणजे खारघर सागरी किनारा मार्ग किंवा कोस्टल रोड. सिडकोच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांवरून थेट १० मिनिटांवर येणार आहे. तसेच, भविष्यात नवी मुंबई विमानतळापर्यंत हाय-स्पीड कनेकटीव्हीटी निर्माण होण्यास मदत होणार आहे. खारघर कोस्टल रोडसाठी तब्बल १०२०.७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग ९.६७८ किमी लांब असून पनवेलच्या खाडीवरून खारघर, सीबीडी बेलापूर आणि नेरूळपर्यंत जोडणार आहे. या मार्गाचं बांधकाम सध्या दोन टप्प्यात सुरू आहे.

पहिल्या टप्प्यात खारघर ते सीबीडी बेलापूर मार्ग तयार करण्यात येणार असून पुढील टप्प्यात सीबीडी बेलापूर ते नेरूळ जेट्टीपर्यंत रस्ता बांधण्यात येईल. दरम्यान, विमानतळासह हा मार्ग शीव-पनवेल महामार्गाशीही जोडला गेला असेल. त्यामुळे मुंबईतील पूर्व उपनगरं थेट विमानतळापर्यंत जोडली जातील. खारघरच्या सेक्टर १६ मधील जलमार्गापासून हा कोस्टल रोड सुरू होणार आहे. पनवेल खाडीवरून खारघर स्थानकाजवळील पे हाऊसिंग स्कीमच्या बाजूने सीबीडी बेलापूरमधील सेक्टर १५ पर्यंत हा मार्ग जातो. त्यापुढे डीपीएस नेरुळ परिसरात संपतो. कोस्टल रोडमुळे खारफुटी आणि खाडीवर कमीत-कमी परिणाम होण्यासाठी या मार्गाचा काही भाग जमिनीच्या दिशेने वळवण्यात आला आहे. खारघर कोस्टल रोडमुळे मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाच्या मार्गांना नवी मुंबई शहर आणि विमानतळाशी जोडणी मिळणार आहे. शीव पनवेल मार्गावर कोस्टल रोड गृहनिर्माण प्रकल्प आणि कॉर्पोरेट पार्कला ही जोडणार आहे. तसेच, खारघरमध्ये नवीन बनत असलेल्या आंतरराष्ट्रीय कोर्पेरेट पार्कशीही थेट जोडणी मिळणार आहे. नेरूळजवळ या मार्गाला पाम बीच रोडशीही थेट जोडणी मिळणार आहे. खारघर कोस्टल रोडमुळे खारघर, सीबीडी बेलापूर आणि नेरुळदरम्यान प्रवासाचा वेळही कमी होणार आहे.

Previous Post

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

Next Post

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

Next Post
१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

BreakingNews

इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा भडकला; भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला

पुणेकरांनो, सावधान! महापालिका पुढील ३ महिने करणार ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा?

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत! – बच्चू कडूंचे विधान

इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीला नवे बळ!

आता ठरावीक वजनाच्या पॅकिंगमध्येच मिळणार खाद्यतेल! – केंद्र सरकार

मुंबई मेट्रो १ ला १२ वर्षे पूर्ण; १२५ कोटी प्रवाशांचा टप्पा पार!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.