Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडकी बहीण ई-केवायसी करण्यासाठी अंगणवाडी सेविका करणार मदत!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 22, 2025
in ताज्या बातम्या, पुणे, मुंबई
लाडकी बहीण ई-केवायसी करण्यासाठी अंगणवाडी सेविका करणार मदत!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र हे ई-केवायसी करताना वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड देणे आवश्यक करण्यात आले होते. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांचे पती आणि वडील दोन्ही नसल्यामुळे अशा महिलांना ई-केवायसी करताना मोठ्या अडचणी येत होत्या. यावर आता राज्य सरकारकडून तोडगा काढण्यात आला आहे. याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मार्ग सांगितला आहे.

महिलांना ई-केवायसीदरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, आता अशा महिलांसाठी शासनाने विशेष सुविधा सुरू करून दिली आहे. यामध्ये संबंधित लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करून त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी. त्यानंतर शहानिशा करून त्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संबंधित लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. मात्र ३१ डिसेंबरपर्यंत त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची पुर्तता लाभार्थी महिलांना करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करून पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची प्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे ३१ डिसेंबरपर्यंत जमा करावी. अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांचेमार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी.

 

Previous Post

टीब्रेकपूर्वीच भारताला मिळली पहिली विकेट!

Next Post

नवी मुंबईतील कोपरी गावात पोलिसांचा छापा; कोटींच्या हिरॉईन ड्रग्ससह आरोपीला अटक

Next Post
नवी मुंबईतील कोपरी गावात पोलिसांचा छापा; कोटींच्या हिरॉईन ड्रग्ससह आरोपीला अटक

नवी मुंबईतील कोपरी गावात पोलिसांचा छापा; कोटींच्या हिरॉईन ड्रग्ससह आरोपीला अटक

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.