Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

नवी मुंबईतील कोपरी गावात पोलिसांचा छापा; कोटींच्या हिरॉईन ड्रग्ससह आरोपीला अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 22, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
नवी मुंबईतील कोपरी गावात पोलिसांचा छापा; कोटींच्या हिरॉईन ड्रग्ससह आरोपीला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरी गावात एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी एका घरातून ३४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन घराची झडती केली. धक्कादायकरित्या त्याच्या घरातून दोनशे ग्रॅम पेक्षा जास्त ड्रग्ज आढळून आले आहे. या ड्रग्सची किंमत बाजारमूल्यानुसार १ कोटी ३६ लाख रुपये एवढी आहे. हे हिरॉईन ड्रग्स सध्या पोलिसांनी जप्त केले आहे.

मागील काही दिवसांपासून माहिती मिळत असल्याने कोपरी गावात नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने जाळे रचून छापा टाकला. या प्रकरणी ३४ वर्षीय विक्रमसिंह अमरसिंह यास ताब्यात घेतले असून त्याच्या घरातून १ कोटी ३६ लाख बाजारमूल्य असलेला ड्रग्ज (हिरॉईन) हस्तगत केले आहे. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत हे ड्रग्स पंजाबमधून रेल्वे, ट्रकद्वारे आणून महाराष्ट्राच्या अनेक भागासह नवी मुंबईतील तरुणांना विक्री केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या कारवाईत एक आरोपीला अटक केली असली तरी यात अनेकजण सामील असल्याचा संशय असल्याने पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र नवी मुंबई पोलिसांचे ड्रग्ज मुक्त नवी मुंबई अभियान सुरू असताना अशा कारवाया होत आहेत, ज्यात करोडो रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले जात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला असे ड्रग्ज सप्लायर्स घाबरत नसल्याचे चित्र आहे. मात्र पोलिसांनी याबाबत अधिकची माहिती देताना, आम्ही अनेक संशयित ठिकाणी साध्या वेशातील पोलिस तैनात केले असून आणि अशा काही नागरिकांना असे संशयित व्यक्ती आढळल्यास आम्हाला माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत नागरिकांनी सतर्क रहावे असेही पोलिसांनी सांगितले आहे.

Previous Post

लाडकी बहीण ई-केवायसी करण्यासाठी अंगणवाडी सेविका करणार मदत!

Next Post

बिग बॉस फेम मराठी अभिनेता शिव ठाकरे यांच्या घराला भीषण आग!

Next Post
बिग बॉस फेम मराठी अभिनेता शिव ठाकरे यांच्या घराला भीषण आग!

बिग बॉस फेम मराठी अभिनेता शिव ठाकरे यांच्या घराला भीषण आग!

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.