Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

“मराठीत नामफलक लावा नाहीतर..” महापालिका शिक्षण विभागाचा शाळांना इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 21, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
“मराठीत नामफलक लावा नाहीतर..” महापालिका शिक्षण विभागाचा शाळांना इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : राज्यातील दुकाने, आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठी करणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टिका होऊ लागताच, खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिका शिक्षण विभागाने शाळांना नोटीसा बजावल्या होत्या. यानंतर शहरातील ४०१ पैकी २४८ शाळांनी केवळ मराठीत नामफलक बसविल्या आहेत तर, मराठी नामफलक बसविण्यास टाळाटाळ करीत असलेल्या उर्वरित १५३ शाळांना शिक्षण विभागाने पुन्हा नोटीसा बजावण्यास सुरूवात केली आहे. त्यात आठ दिवसात नामफलक मराठीत बसविले नाही तर, शाळा मान्यता रद्दचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा इशारा देण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ७६९ खाजगी अनुदानित, विनाअनुदानित आणि महापालिका शाळा आहेत. त्यात ठाणे महापालिकेच्या ९५ प्राथमिक, ७ माध्यमिक अशा एकुण १०२ शाळा आहेत. तर २०९ खाजगी अनुदानित आणि ५६० विनाअनुदानित शाळा आहेत. यामध्ये ४०१ इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. राज्यातील दुकाने, आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठी करणे बंधनकारक आहे. असे असतानाही त्याकडे शाळांकडून दुर्लक्ष होत होते आणि पालिका शिक्षण विभागाकडूनही ठोस कारवाई होताना दिसून येत नव्हती. याविरोधात काँग्रेस पक्षाने काही दिवसांपुर्वी आंदोलन केले होते. त्यात शाळांच्या इमारतींचे बांधकाम परिक्षण करावे आणि मराठीत नामफलक लावावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांनीही अशीच मागणी यापुर्वीही केली होती. राजकीय पक्षांची मागणी आणि आंदोलनानंतर शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी शाळा प्रशासनाला पत्र पाठविले होते. त्यात महापालिका शाळा, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्य, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. त्याचबरोबर शाळांमधील सर्व पत्रव्यवहाराची भाषा देखील मराठीच असावी. असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते. यानंतर ठाणे पालिका क्षेत्रातील ४०१ इंग्रजी शाळांपैकी २४८ शाळांचे नामफलक मराठीत केल्याची माहिती पुढे आली आहे.

Previous Post

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती; शिक्षकांची नाराजी

Next Post

मिरा-भाईंदर शाळांमध्ये ९८३ गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप; सरकारचा निर्णय

Next Post
मिरा-भाईंदर शाळांमध्ये ९८३ गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप; सरकारचा निर्णय

मिरा-भाईंदर शाळांमध्ये ९८३ गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप; सरकारचा निर्णय

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.