Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मुसळधार पावसामुळे कल्याण-मुरबाड मध्ये रस्ता जलमय

मुसळधार पावसामुळे उल्हास, काळू नद्यांना महापूर आला आहे. या नद्यांचे पाणी परिसरातील गाव हद्दीत शिरल्याने कल्याण-मुरबाड रस्ता अनेक गाव हद्दीत जलमय झाला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 25, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
मुसळधार पावसामुळे कल्याण-मुरबाड मध्ये रस्ता जलमय
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : मुसळधार पावसामुळे उल्हास, काळू नद्यांना महापूर आला आहे. या नद्यांचे पाणी परिसरातील गाव हद्दीत शिरल्याने कल्याण-मुरबाड रस्ता अनेक गाव हद्दीत जलमय झाला आहे. या रस्त्यावरील कल्याण ते अहमदनगरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नगरकडून भाजीपाला, दूध घेऊन येणारी मालवाहू वाहने जागोजागी अडकून पडली आहेत. मुरबाड रस्त्यावरील किशोर गाव परिसरात पुराचे पाणी घुसले आहे. टोकावडे गावाजवळील हेदवली पूल पाण्याखाली गेल्याने गाव परिसराचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. मुरबाडी नदी दुथडी वाहत आहे. या नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उल्हासनगर जवळील म्हारळ, कांबा भागात पुराचे पाणी शिरल्याने या भागातील मुरबाड रस्ता जलमय झाला आहे. वाहन चालक आव्हान स्वीकारून या पुराच्या पाण्यातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. मुरबाड-कल्याण मार्गावर एस. टी. महामंडळाच्या बस अनेक ठिकाणी खोळंबून राहिल्या आहेत. पहाटे तीन ते चार वाजता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजीपाला घेऊन दाखल झालेली मालवाहू वाहने परतीच्या वाटेवर कल्याण, मुरबाड परिसरात अडकून पडली आहेत. उल्हास आणि काळू नद्या टिटवाळा, बदलापूर, जांभूळ, मोहने भागात इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत.

Previous Post

डोंबिवलीतल्या इंजिनिअरने अटल सेतूवरुण समुद्रात उडी मारून केली आत्महत्या

Next Post

रस्त्यावरील खड्डेप्रकरणी कंत्राटदार आणि सल्लागाराविरोधात कडक कारवाई, ५० लाखांचा दंड

Next Post
रस्त्यावरील खड्डेप्रकरणी कंत्राटदार आणि सल्लागाराविरोधात कडक कारवाई, ५० लाखांचा दंड

रस्त्यावरील खड्डेप्रकरणी कंत्राटदार आणि सल्लागाराविरोधात कडक कारवाई, ५० लाखांचा दंड

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.