Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

डोंबिवलीतल्या इंजिनिअरने अटल सेतूवरुण समुद्रात उडी मारून केली आत्महत्या

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर कार थांबवत तरुणाने उडी मारली आणि आयुष्य संपवलं

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 25, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
डोंबिवलीतल्या इंजिनिअरने अटल सेतूवरुण समुद्रात उडी मारून केली आत्महत्या
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या अटल सेतूवर कार थांबवत एक तरुण खाली उतरला, त्याने इकडे तिकडे पाहिलंही नाही. अवघ्या काही सेकंदात समुद्रात उडी घेतली आणि आयुष्य संपवलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मार्च महिन्यात किंजल शाह या महिला डॉक्टरने याच अटल सेतूवरुन उडी मारत आयुष्य संपवलं होतं. आता पुन्हा अशीच घटना घडली आहे. त्यामुळे अटल सेतू या आत्महत्येच्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. तसंच या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत. करुतुरी श्रीनिवासन हा तरुण त्याच्या टाटा नेक्सॉन कारने अटल सेतूवर आला. त्याने काहीही कळायच्या आत अवघ्या काही सेकंदात उडी मारली. हा तरुण डोंबिवलीचा आहे. तो त्याच्या कार क्रमांक MH O5 EV 0849 मधून उतरला आणि अवघ्या काही सेकंदात खवळत्या समुद्रात स्वतःला झोकून दिलं. श्रीनिवासन हा कुवेतमध्ये नोकरी करत होता. मात्र वैफल्य आल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

श्रीनिवास कुरुकुट्टी कुवैत येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. मात्र ऑक्टोबर महिन्यात नोकरी सोडून डोंबिवलीत ते त्यांचा व्यवसाय करत होता. आर्थिक अडचणींमुळे तो तणावात होता. दुपारी साडे बाराच्या सुमारास ते चारचाकी गाडीतून अटलसेतूवर आले आणि सेतूवरुन थेट खवळलेल्या समुद्रात उडी घेतली. याआधी कुवेतमध्येही या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी नालासोपारा या ठिकाणी वडील आणि मुलाने रेल्वे ट्रॅकवर झोकून देत आयुष्य संपवलं. शेअर बाजारात नुकसान झाल्याने या दोघांनी आयुष्य संपवल्याची घटना समोर आली होती. आता अटल सेतूवरुन उडी मारत डोंबिवलीतल्या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेमुळे अटल सेतू चर्चेत आला आहे.

Previous Post

पूरस्थितीत प्रशासनाचे बचावकार्य सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मुसळधार पावसामुळे कल्याण-मुरबाड मध्ये रस्ता जलमय

Next Post
मुसळधार पावसामुळे कल्याण-मुरबाड मध्ये रस्ता जलमय

मुसळधार पावसामुळे कल्याण-मुरबाड मध्ये रस्ता जलमय

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.