Lokrakshanay
Tuesday, June 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

रस्त्यावरील खड्डेप्रकरणी कंत्राटदार आणि सल्लागाराविरोधात कडक कारवाई, ५० लाखांचा दंड

सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पातील एमटीएनएल जंक्शन – एलबीएस मार्ग उन्नत रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 26, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
रस्त्यावरील खड्डेप्रकरणी कंत्राटदार आणि सल्लागाराविरोधात कडक कारवाई, ५० लाखांचा दंड
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पातील एमटीएनएल जंक्शन – एलबीएस मार्ग उन्नत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परिणामी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. याप्रकरणी कंत्राटदार जे. कुमारला ५० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जोपर्यंत खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जात नाही, तोपर्यंत दिवसाला १० लाख रुपये दंडही ठोठावण्यात येणार आहे. बीकेसीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत एमटीएनएल जंक्शन – एलबीएस मार्ग दरम्यान १.२६ किमी लांबीचा उन्नत रस्ता बांधण्यात आला. या उन्नत रस्त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी २०२३ मध्ये करण्यात आले. हा उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला होऊन दीड वर्ष होत नाही तोच या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

रस्ता बंद करतानाच कंत्राटदार मेसर्स जे. कुमारला तात्काळ खड्डे बुजविण्याचे आदेश देऊन ५० लाख रुपये दंड ठोठावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे एका दिवसात खड्डे बुजवले नाही, तर जोपर्यंत खड्डे बुजवून रस्ता वाहतूक सेवेत दाखल होत नाही तोपर्यंत दिवसाला १० लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे. खड्डेप्रकरणी कंत्राटदार आणि सल्लागाराविरोधात कडक कारवाई करतानाच एमएमआरडीएच्या उपअभियंत्याविरोधातही एमएमआरडीएने कारवाई केली आहे. उपअभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Previous Post

मुसळधार पावसामुळे कल्याण-मुरबाड मध्ये रस्ता जलमय

Next Post

डोंबिवलीत बेकायदा चाळी पावसाच्या पुराच्या पाण्याच्या विळख्यात

Next Post
डोंबिवलीत बेकायदा चाळी पावसाच्या पुराच्या पाण्याच्या विळख्यात

डोंबिवलीत बेकायदा चाळी पावसाच्या पुराच्या पाण्याच्या विळख्यात

BreakingNews

‘देऊळ बंद २’चा नफा शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडेंचा ऐतिहासिक निर्णय!

मुंबईत मराठी नामफलक मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१२४ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई!

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.