Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

३० मिनिटांचा प्रवास आता १० मिनिटात! वाकोला – बीकेसी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 5, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
३० मिनिटांचा प्रवास आता १० मिनिटात! वाकोला – बीकेसी पुलाचे काम अंतिम टप्प्यात
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत (एससीएलआर) वाकोला ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) दरम्यान उड्डाणपूल बांधत आहे. हा पूल आतापर्यंत वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. आता मात्र प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून मार्चपर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत हा पूल वाहतूक सेवेत दाखल केला जाणार असल्याने मार्चअखेरपासून बीकेसी – वाकोला आणि पुढे पश्चिम द्रुतगती मार्ग असा प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे. एमएमआरडीएने सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्ताराअंतर्गत समाविष्ट असलेला शेवटचा उड्डाणपूल म्हणजे वाकोला – बीकेसी उड्डाणपूल १.२ किमी लांबीच्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.

वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ जंक्शन आणि बीकेसी जंक्शन येथे जाणे सोपे व्हावे आणि येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी एमएमआरडीएने या पुलाचे बांधकाम घेतले आहे. या पुलाचे काम सुरू होऊन अनेक वर्षे झाली असून आतापर्यंत पूल वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र कामाची संथगती आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाला आहे. पण आता मात्र या प्रकल्पाचे ८५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. उर्वरित काम येत्या काही दिवसात पूर्ण करून मार्चअखेरीस हा पूल वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन मार्गिकेच्या आणि ६४५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे वाकोला, पश्चिम द्रुतगती मार्ग ते बीकेसी प्रवास अतिजलद होणार आहे. ५ ते १० मिनिटात हे अंतर पार करता येणार असून प्रवासी – वाहनचालकांचा २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार असल्याचा दावा यानिमित्ताने एमएमआरडीएकडून केला जात आहे. सिग्नलमुक्त या पुलामुळे दहिसर, अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना बीकेसीत ५ ते १० मिनिटांत येणे आता सोपे होणार आहे. आजघडीला पूर्व द्रुतगती मार्गावरून बीकेसीत येण्यासाठी वाहनचालक – प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. पण मार्चपासून मात्र त्यांचा प्रवास सुकर होणार आहे. वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ जंक्शन आणि बीकेसी जंक्शन येथे पोहचणे सोपे होणार आहे.

Previous Post

नेटफ्लिक्सचा मनोरंजनाचा खजिना! १८ नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणाऱ्या घोषणा

Next Post

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत MSRDCचा तात्काळ प्रतिसाद; वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण

Next Post
यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत MSRDCचा तात्काळ प्रतिसाद; वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत MSRDCचा तात्काळ प्रतिसाद; वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.