Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत MSRDCचा तात्काळ प्रतिसाद; वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 5, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत MSRDCचा तात्काळ प्रतिसाद; वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी) तत्काळ कार्यान्वित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी आय.आर.बी.एम.पी.ई.पी.एल.मार्फत पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित टोल नाक्यांवर तात्पुरत्या स्वरूपात टोलमुक्त प्रवेश व निर्गमन सुविधा देण्यात आली. दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रासायनिक तज्ज्ञांच्या पथकाने टँकरवरील दोन ठिकाणची वायू गळती पूर्णपणे थांबवली असून तिसरी गळतीही मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता अपघातग्रस्त टँकरमधील वायू सुरक्षित टँकरमध्ये स्थानांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अपघातग्रस्त टँकर हटवून मुंबई वाहिनीवरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे एम.एस.आर.डी.सी.कडून कळवण्यात आले.

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील मुंबई वाहिनीवर कि.मी. ४१/२०० येथे, अडोशी बोगद्याजवळ (बोरघाट विभागात) दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारा रासायनिक वायू वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील असा प्रॉपिलीन वायू भरलेला होता. अपघातानंतर टँकरच्या ट्रेलरवरील तीन व्हॉल्व्हना नुकसान झाल्याने वायू गळती सुरू झाली. क्विक रिस्पॉन्स वाहने, रुग्णवाहिका, डेल्टा फोर्स, पेट्रोलिंग कर्मचारी, अग्निशमन उपकरणे तसेच आवश्यक यंत्रसामग्री घटनास्थळी तत्काळ तैनात करण्यात आली. यासोबतच टाटा स्टील आणि खोपोली नगरपरिषद येथून अतिरिक्त अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्यात आले. वायू अत्यंत ज्वलनशील असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीने मुंबई वाहिनीवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायंकाळी ७.३० वाजता महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांमधील मध्य बॅरीअर हलवून पुणे वाहिनीवरील एक लेन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली. पुण्याकडे जाणारी वाहतूक उर्वरित दोन लेनमधून सुरू ठेवण्यात आली. तसेच मुंबईकडे जाणारी हलकी वाहतूक मॅजिक पॉइंट येथून खोपोली (जुना महामार्ग) मार्गे वळविण्यात आली. रासायनिक तज्ज्ञांचे पथक रात्री ८.३० वाजता तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) रात्री १०.२० वाजता घटनास्थळी दाखल झाले. मात्र, टँकरच्या व्हॉल्व्हचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्या वेळी गळती पूर्णपणे थांबवणे शक्य झाले नाही. दरम्यान,एम.एस.आर.डी.सी.मार्फत एफ.एम. रेडिओ, सोशल मीडिया व अन्य माध्यमांद्वारे प्रवाशांना द्रुतमार्गावरील वाहतूक परिस्थितीबाबत सातत्याने माहिती देण्यात आली. अत्यावश्यक कारणांशिवाय प्रवास टाळण्याचे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. किवळे येथून मुंबई वाहिनीवर वाहनांचा पुढील प्रवेश रोखण्यासाठीही योग्य उपाययोजना करण्यात आल्या.

Previous Post

३० मिनिटांचा प्रवास आता १० मिनिटात! वाकोला – बीकेसी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

Next Post

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप

Next Post
मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.