Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

केस पेपरसाठी केईएम रुग्णालयात लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी करावा

आयुक्त भूषण गगराणी यांचे रुग्णालय प्रशासनाला निर्देश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 15, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
केस पेपरसाठी केईएम रुग्णालयात लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी करावा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : केईएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचा ओघ अधिक असतो. या परिस्थितीत रुग्णांना केस पेपरसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी बाह्य रुग्ण खिडकीजवळ अधिक मनुष्यबळ नेमावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच रुग्णालयातील पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी गगराणी यांनी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी त्यांनी रुग्ण खिडकीजवळ रुग्णांशी संवाद साधत असताना त्यांनी केस पेपर संदर्भातील निर्देश दिले. पाहणी दरम्यान आयुक्तांनी रुग्णालयाच्या विविध कक्षातील सुविधांची बारकाईने पाहणी केली.

सध्या रुग्णालयात सहा कक्षांची कामे सुरू आहेत. त्याचीही त्यांनी माहिती घेतली. ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केईएम रुग्णालयात शतक महोत्सवी वर्षानिमित्त तयारीचा देखील सविस्तरपणे गगराणी यांनी आढावा घेतला. जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे रुग्णालयात आयोजन करण्यात आले आहे. शतक महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण प्रशासनाने सहभागी होण्यासाठी सूचना करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. केईएम रुग्णालय पुनर्विकास अंतर्गत नवीन इमारतींचे बांधकाम प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये सर्व्हीस टॉवर, कर्मचारी भवन, परिचारिका वसतिगृह या इमारतीचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी गगराणी यांनी दिले.

Previous Post

केंद्रावर रुग्णांना मोफत मार्गदर्शन; ठाणे जिल्ह्यात प्रथमच कर्करोग माहिती केंद्र

Next Post

२२९० मतदारांनी मुंबई उपनगरात बजावला गृहमतदानाचा हक्क

Next Post
महापालिकेच्या यंत्रणेमार्फत ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश

२२९० मतदारांनी मुंबई उपनगरात बजावला गृहमतदानाचा हक्क

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.