Lokrakshanay
Friday, August 7, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणे जिल्हा परिषदेकडून नागरिकांसाठी WhatsApp Chatbot सेवा सुरू; शासकीय सेवा आता घरबसल्या!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 7, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
ठाणे जिल्हा परिषदेकडून नागरिकांसाठी WhatsApp Chatbot सेवा सुरू; शासकीय सेवा आता घरबसल्या!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने घरबसल्या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणे यांनी अधिकृत WhatsApp Chatbot सेवा सुरू केली आहे. +91 89991 54140 या WhatsApp क्रमांकावर उपलब्ध असलेली ही डिजिटल सुविधा Thane Doorstep Delivery Portal शी संलग्न करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा, शासनाच्या योजना, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची माहिती, अर्जाची सद्यस्थिती, तक्रार नोंदणी तसेच विविध विभागांशी संबंधित आवश्यक माहिती मोबाईलवरून सहज मिळणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार असून, वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होण्यास मदत होणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी सांगितले की, हा WhatsApp Chatbot मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून, सर्वसामान्य नागरिकांनाही सहज वापरता येईल अशा पद्धतीने तो विकसित करण्यात आला आहे. विविध विभागांच्या सेवा, शासनाच्या योजनांची माहिती, अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्जाची सद्यस्थिती, संपर्क माहिती आणि इतर मार्गदर्शन नागरिकांना काही क्षणांत उपलब्ध होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले की, नागरिक-केंद्रित प्रशासनाच्या दिशेने WhatsApp Chatbot हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शासकीय सेवा जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. Thane Doorstep Delivery Portal शी संलग्न असलेल्या या सुविधेमुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

Thane Doorstep Delivery Portal ही जिल्हा परिषद, ठाणे यांनी विकसित केलेली नागरिकाभिमुख डिजिटल व्यवस्था असून, ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा घरबसल्या उपलब्ध करून देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. जन्मदाखला, उत्पन्न दाखला, विविध प्रमाणपत्रे, परवाने, नोंदी तसेच जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास विभागाशी संबंधित विविध सेवांची माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे. WhatsApp Chatbot या पोर्टलशी एकत्रित करण्यात आल्याने नागरिकांना आवश्यक सेवा शोधणे, संबंधित माहिती मिळविणे आणि पुढील प्रक्रिया समजून घेणे अधिक सोपे झाले आहे. या Chatbot द्वारे Right to Service (RTS) अंतर्गत अधिसूचित सेवांची माहिती, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, सेवा मिळण्याचा कालावधी तसेच अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. Android आणि iOS या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनवर ही सेवा वापरता येणार आहे. याशिवाय नागरिकांना आपल्या सूचना, अभिप्राय आणि तक्रारी थेट नोंदविण्याची सुविधाही देण्यात आली आहे. हा Chatbot राज्य शासनाच्या Centralised WhatsApp Helpline आणि मुख्यमंत्री हेल्पलाइन प्रणालीशी जोडण्यात आला असून, नोंदविलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे तक्रारींचे जलद निवारण, प्रभावी पाठपुरावा आणि सेवा वितरणातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषद, ठाणे यांनी यापूर्वी Facebook, Instagram, YouTube, X तसेच Public App या डिजिटल माध्यमांतून नागरिकांशी संवाद सुरू केला आहे. आता WhatsApp Chatbotच्या माध्यमातून शासनाच्या योजना, विकासकामे, जनजागृती मोहिमा, प्रेसनोट, निविदा, महत्त्वपूर्ण सूचना आणि विविध विभागांच्या सेवांची अधिकृत माहिती नागरिकांना थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी +91 89991 54140 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून “Hi” किंवा “नमस्कार” असा संदेश पाठवावा आणि या डिजिटल सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

‘काम बंद केले तर पगारही नाही’; हायकोर्टाच्या दणक्यानंतर डॉक्टरांचा संप मागे

Next Post

गणेशोत्सवाच्या उत्साहात आवाजावर मर्यादा; ढोल-ताशा सरावावर आता महापालिकेची नजर!

Next Post
गणेशोत्सवाच्या उत्साहात आवाजावर मर्यादा; ढोल-ताशा सरावावर आता महापालिकेची नजर!

गणेशोत्सवाच्या उत्साहात आवाजावर मर्यादा; ढोल-ताशा सरावावर आता महापालिकेची नजर!

BreakingNews

नवी मुंबईत देशभक्तीसोबतच आरोग्याचा जागर; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला जोडली आरोग्याची पाऊले

जिजाऊ संस्थेचा शैक्षणिक उपक्रम; पिवळी केंद्रातील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वाटप

महिला आशिया चषकात भारत-पाकिस्तान आमनेसामने; ५ सप्टेंबरला महामुकाबला!

गणेशोत्सवाच्या उत्साहात आवाजावर मर्यादा; ढोल-ताशा सरावावर आता महापालिकेची नजर!

ठाणे जिल्हा परिषदेकडून नागरिकांसाठी WhatsApp Chatbot सेवा सुरू; शासकीय सेवा आता घरबसल्या!

‘काम बंद केले तर पगारही नाही’; हायकोर्टाच्या दणक्यानंतर डॉक्टरांचा संप मागे

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.