वृत्तसंस्था : या अभिनेत्रीनं बालपणापासून संघर्ष केला.वडिलांनी टाकलं नवऱ्याने फसवलं. काही वर्षांनी आईनेही साथ सोडली. आज मिलियन फॉलोवर्स असूनही ती एकटी आहे.’ असं म्हणतात कभी कभी कुछ पाने के लिये कुठ खोना पडता हैं. पण ही प्रसिद्ध अभिनेत्री यश, पैसा, प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात तिचं सगळं हरवून बसली आहे. आज तिचे इन्स्टाग्रामवर १४M फॉलोअर्स आहेत. पण खऱ्या आयुष्यात ती एकटी आहे. मम्मी कुठे आहेस तू… मला माफ कर… असं म्हणत या मराठमोळ्या अभिनेत्रीनं कॅमेऱ्यासमोर हंबरडा फोडला. तिचं दु:ख पाहून प्रेक्षकही भावूक झाले. बालपणापासून संघर्ष, वडिलांनी घरातून हकललं, प्रेमात झालेली फसवणूक आणि आईचं अचानक निघून जाणं या सगळ्या वेदना तिनं उघडपणे मांडल्या. आज ती तिच्या आयुष्यात पूर्णपणे एकटी आहे. पण प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र तिनं थांबवलेलं नाही.
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजेच ड्रामा क्विन राखी सावंत. राखी बिग बॉस मधून घराघरात पोहोचली. शोमधील तिचा बिनधास्त स्वभाव, वादग्रस्त विधानं आणि मनोरंजनाची स्टाईल यामुळे ती कायम चर्चेत राहिली. मात्र पडद्यामागची तिची रिअॅलिटी मात्र याहून खूप वेगळी आणि वेदनादायक आहे. बिग बॉस मराठी ६ मध्ये असलेल्या राखीनं घरात पहिल्यांदाच तिच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केले. आईच्या आठवणीत तिनं व्यक्त केलेले शब्द मन हेलावून टाकणारे होते. राखीनं आदिल खान दुर्रानीबरोबर लग्न केलं होतं. मात्र या लग्नात तिची फसवणूक झाली. राखीनं लग्न केलं तेव्हा तिचा आईचा याला विरोध होता. तिने तिला आधीच सांगितं होतं की तू खूप मोठी चूक करतेस. तिच्या आईचे शब्द खरे ठरले. राखी म्हणाली, “मम्मी कुठे आहेस तू, मला माफ कर, मी तुझ्याविरोधात लग्न केलं. मला माफ कर, मी कधीच चुकी नाही करणार. तू मला सांगत होती हा मुलगा बरोबर नाही, चांगला नाही. तू तुझ्या आयुष्याचं, भविष्याचं वाटोळं केलं आहेस. आमचं नाव खराब केलंस. सॉरी मम्मी.” आईच्या निधनाच्या खूप वर्ष आधी राखीच्या वडिलांचंही निधन झालं. राखीच्या वडिलांचा नेहमी तिच्या करिअरला विरोध होता. राखीला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तिच्या आईने तिला सपोर्ट केला. या काळात तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला घरातून बाहेर काढलं. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्याला वाळीत टाकलं पण राखीला तिच्या आईने शेवटपर्यंत साथ दिली. राखी म्हणाली, “तू गेलीस बाबा गेले. तू खूप दु:ख सहन केलंस. आम्हाला मोठं केल, आम्हाला शिक्षण दिलं, मला बॉलिवूडमध्ये साथ दिली. पूर्ण खानदानाने हकलून दिलं आपल्याला पण तू माझी साथ दिली मम्मी.” अनेक लोक राखी ओळखायला चुकतात. मज्जा मस्ती करणारी राखी, वाद घालणारी राखी याच्यामागे एक मुलगी आहे. जिने आपल्या परिवारासाठी खस्ता खाल्ल्या. आयुष्यात अनेक चढ उतार पाहून आज ती एकटी आपलं आयुष्य जगतेय.

