Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणे मेट्रोचा अजब कारभार! स्टेशन जवळचा बस थांबा दूर गेल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 27, 2026
in ताज्या बातम्या, पुणे
पुणे मेट्रोचा अजब कारभार! स्टेशन जवळचा बस थांबा दूर गेल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : रामवाडी मेट्रो स्थानक परिसरातील पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) बसथांबा वाहतूक कोंडीचे कारण देऊन २०० मीटर पुढे हलवण्यात आला आहे. या निर्णयामुळे मेट्रोने प्रवास करून पुढे बसने जाणाऱ्या प्रवाशांना पायपीट करावी लागत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र, मेट्रो स्थानकाच्या खाली कायम रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नगर रस्ता परिसरातील विमाननगर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, वाघोली येथील नागरिक मोठ्या प्रमाणात शहराच्या मध्यवर्ती भागात; तसेच पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी मेट्रोचा वापर करतात. रामवाडी मेट्रो स्थानकातून दररोज १५ ते २० हजार प्रवासी प्रवास करीत असल्याचे दिसून येते. यापैकी काही जण स्वतःचे वाहन स्थानकाजवळ उभे करतात; पण पार्किंगची मर्यादित जागा लक्षात घेता मोठ्या संख्येने प्रवासी पीएमपी बसचा पर्याय निवडतात. यापूर्वी मेट्रो स्थानकाच्या खालीच पीएमपीचा थांबा असल्याने प्रवाशांना सहजपणे पुढील प्रवास करता येत होता. आता थांबा पुढे हलवल्याने मेट्रोतून उतरून बसपर्यंत पोहोचण्यासाठी किमान २०० मीटर अंतर चालावे लागते. विमानतळाकडे किंवा तेथून परतणाऱ्या प्रवाशांकडे मोठे सामान असल्याने त्यांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांनी कोंडीचे कारण देत पीएमपी प्रशासनाला थांबा हलवण्याची सूचना केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, मेट्रो स्थानकाच्या खाली अद्यापही रिक्षा, कॅब आणि पिवळ्या टमटम मोठ्या प्रमाणात उभ्या राहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोंडीस कारणीभूत ठरणारे हे वाहनप्रकार नाहीत का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. नवीन प्रवाशांना थांबा पुढे हलवण्यात आल्याची माहिती नसल्याने काही जण नाईलाजाने रिक्षाचा पर्याय स्वीकारतात. स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या काही रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारीही आहेत. स्थानकाजवळच पुढे मोकळी जागा आणि रुंद रस्ता उपलब्ध असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्या ठिकाणीच बसथांबा केल्यास मेट्रोमधून उतरल्यावर लगेच बस मिळेल आणि पायपीट टळेल, असे मत व्यक्त होत आहे.

Previous Post

१२१ कुटुंबियांच्या घरात पुन्हा आनंद! ‘ऑपरेशन मुस्कान’मुळे लागला हरवलेल्या मुलांचा शोध

Next Post

कॅमेऱ्यासमोर हसू आणि मागे वेदना! Insta वर १४M फॉलोअर्स असलेली ‘ही’ अभिनेत्री खऱ्या आयुष्यात पोरकी?

Next Post
कॅमेऱ्यासमोर हसू आणि मागे वेदना! Insta वर १४M फॉलोअर्स असलेली ‘ही’ अभिनेत्री खऱ्या आयुष्यात पोरकी?

कॅमेऱ्यासमोर हसू आणि मागे वेदना! Insta वर १४M फॉलोअर्स असलेली 'ही' अभिनेत्री खऱ्या आयुष्यात पोरकी?

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.