Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

पनवेल महानगरपालिकेचा कारभार आता आधुनिक प्रणालीद्वारे!

नवनिर्वाचित नगरसेवकांना ‘टॅब’ देण्याची महानगरपालिका तयारीत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 2, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
पनवेल महानगरपालिकेचा कारभार आता आधुनिक प्रणालीद्वारे!
Share on FacebookShare on Whatsapp

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित ७८ नगरसेवकांना प्रथमच आधुनिक टॅबलेट (संगणक) तसेच महापालिका अधिनियमांचे मार्गदर्शक पुस्तक देण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनात सुरू आहेत. या टॅबलेटच्या माध्यमातून नगरसेवकांनी महापालिकेचा दैनंदिन कारभार हाताळावा, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. नुकत्याच ई-गव्हर्नन्समध्ये राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पनवेलने प्रथम क्रमांक पटकावत आपली डिजिटल क्षमता अधोरेखित केली आहे.

सध्या महापालिकेत ई-ऑफीस प्रणालीद्वारे कामकाज सुरू असून आयुक्त चितळे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम कारभार पेपरलेस करण्यावर भर दिला. त्यानुसार अधिकारी व कर्मचारी ई-ऑफीसवर काम करत आहेत. याच धर्तीवर नगरसेवकांनीही त्यांच्या तक्रारी, सूचना व पत्रव्यवहार टॅबवरून ई-मेलद्वारे केल्यास प्रशासनाकडून तातडीने त्यास प्रतिसाद देता येईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. २०१६ साली महापालिका स्थापन झाल्यानंतर २०१७ मधील पहिल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांना अशी सुविधा दिली नव्हती. मात्र आता प्रत्येक प्रभागातील २० ते ३५ हजार मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांना थेट महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदविलेल्या नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा किती वेळेत होतो, यावर देखरेख ठेवता येणार आहे. यामुळे सेवाहमी नियमांचे पालन होते की नाही, यावरही नियंत्रण मिळणार आहे. १० फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर निवडीनंतर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना टॅबलेट उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.

Previous Post

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

Next Post

टीडब्ल्यूजे कंपनीचा १२०० कोटींचा महाघोटाळा; मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक

Next Post
टीडब्ल्यूजे कंपनीचा १२०० कोटींचा महाघोटाळा; मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक

टीडब्ल्यूजे कंपनीचा १२०० कोटींचा महाघोटाळा; मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.