Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

टीडब्ल्यूजे कंपनीचा १२०० कोटींचा महाघोटाळा; मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 2, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
टीडब्ल्यूजे कंपनीचा १२०० कोटींचा महाघोटाळा; मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : टीडब्ल्यूजे या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्यप्राय परताव्याचे आमिष दाखवून सुमारे १२०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे यांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना गुजरातमधून अटक केली आहे. ९ फेब्रुवारी २०२४ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत टीडब्ल्यूजे या कंपनीचे संस्थापक व संचालक समीर नार्वेकर, अमित बालम तसेच कंपनीशी संबंधित व्यवस्थापकांनी ठाणेसह संपूर्ण राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये टीडब्ल्यूजे नावाने विविध कंपन्या उघडून सदर कंपन्यामध्ये सुमारे ११,००० गुंतवणूकदारांना बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्यप्राय परताव्याचे आमीष दाखवून सुमारे १२०० कोटी रुपयांचा अपहार केलेबाबतची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीअंती विक्रोळी येथील रहिवासी संजय मापुसकर यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन गुन्हा नोंदविण्यात आला होता. सुरुवातीला फिर्यादी व अन्य १३ गुंतवणूकदारांची सुमारे ३ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. परंतू, पुढील तपासादरम्यान एकूण ३७ गुंतवणूकदारांची सुमारे ७ कोटी ९७ हजार ८६९ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून प्राथमिक तपासात संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे १२०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. परंतू, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास करून समीर सुभाष नार्वेकर (वय ३५) आणि अमित विश्वनाथ बालम (वय ३७) यांना २९ जानेवारी तर, नेहा समीर नार्वेकर (वय ३६) यांना ३० जानेवारी रोजी अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांच्याकडे असून तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी पुढील तपास करत आहेत.

पोलीस आयुक्तालयाकडून आवाहन –
टीडब्ल्यूजे असोसिएटेड प्रा. लि. तसेच संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे येथे पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांच्याशी मोबाईल क्रमांक ८८०५४८६१०० किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३९८५८६ वर संपर्क साधावा.

Previous Post

पनवेल महानगरपालिकेचा कारभार आता आधुनिक प्रणालीद्वारे!

Next Post

४००हून अधिक अनधिकृत बांधकामांवर पुढील १० दिवस पालिकेचा हातोडा

Next Post
४००हून अधिक अनधिकृत बांधकामांवर पुढील १० दिवस पालिकेचा हातोडा

४००हून अधिक अनधिकृत बांधकामांवर पुढील १० दिवस पालिकेचा हातोडा

BreakingNews

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.