Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नवी मुंबई ‘आरटीओ’ची वर्षभरात ९ हजार ३७३ वाहनांवर कारवाई

नवी मुंबई शहरातही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 7, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबई ‘आरटीओ’ची वर्षभरात ९ हजार ३७३ वाहनांवर कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : दिवसेंदिवस वाढत्या अपघातांची संख्या याचे मुख्य कारण म्हणजे वाहन चालवताना वाहतुकीचे नियम डावलून वाहने चालवली जातात. नवी मुंबई शहरातही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. हे अपघात कमी करण्यासाठी वाशी आरटीओ विभागाकडून रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहनांवर एप्रिल २०२३ पासून ते मार्च २०२४ पर्यंत एकूण ९ हजारहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. आरटीओच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नेहमीच सुरक्षित प्रवास वाहतुकीचे धडे दिले जातात. हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट लावणे, मोबाइलवर बोलत वाहन न चालविणे, डोन्ट ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह याविषयी जनजागृती किली जाते. सुरक्षित वाहतुकीचे नियम सांगितले जातात. तरीही वाहनचालक वाहतूक नियम पायदळी तुडवत बेशिस्तपणे वाहने चालवतात.

कित्येकदा दुचाकीस्वार विनाहेल्मेट प्रवास करतात. परिणामी अनवधानाने अपघाताला निमंत्रण दिले जाते आणि हेल्मेट नसल्यामुळे त्यांच्या जिवावर बेतते. त्याचबरोबर चारचाकी वाहनचालकदेखील सीटबेल्ट न वापरता बेफिकिरपणे वाहन चालवतात. शिवाय वाहन चालवताना मोबाइलवरदेखील बोलत असतात . त्यामुळे यादरम्यान नजर हटी दुर्घटना घटी अशा घटना घडतात. अपघातांचे हे प्रमाण कमी करण्यासाठी वाशी आरटीओ विभागाने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत एकूण ९ हजार ३७३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही विनाहेल्मेट आणि योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनचालकांवर करण्यात आली.

आकडेवारी

● विनाहेल्मेट : ३८७५

● सीटबेल्ट : १८८

● वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे : ३९९

● योग्यता प्रमाणपत्र नसणे : ४३६०

● सिग्नल तोडणे : ७४४

Previous Post

वाहतुकीसाठी शिळफाटा उड्डाणपूलाच्या उर्वरित तीन मार्गिका खुल्या

Next Post

पुन्हा तीन दिवसांची मुंबईतील भूखंडाच्या ई लिलावासाठी मुदतवाढ

Next Post
पुन्हा तीन दिवसांची मुंबईतील भूखंडाच्या ई लिलावासाठी मुदतवाढ

पुन्हा तीन दिवसांची मुंबईतील भूखंडाच्या ई लिलावासाठी मुदतवाढ

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.