Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

वाहतुकीसाठी शिळफाटा उड्डाणपूलाच्या उर्वरित तीन मार्गिका खुल्या

कल्याण शीळ मार्गावरील शिळफाटा सहा पदरी उड्डाणपुलाच्या उर्वरित तीन मार्गिका नुकत्याच सुरू करण्यात आल्या आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 6, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
वाहतुकीसाठी शिळफाटा उड्डाणपूलाच्या उर्वरित तीन मार्गिका खुल्या
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : कल्याण शीळ मार्गावरील शिळफाटा सहा पदरी उड्डाणपुलाच्या उर्वरित तीन मार्गिका नुकत्याच सुरू करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. तर नुकतीच या पुलाची दुसरी बाजू देखील वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या शिळफाटा सहा पदरी उड्डाणपुलामुळे शिळफाटा चौकातला प्रवास वेगवान झाला आहे. तर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुरातून ठाणे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळाला असल्याने वाहनचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.  कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर तसेच आसपासच्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ठाणे, नवी मुंबईला जाण्यासाठी कल्याण शीळ मार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मागील वर्षी या रस्त्याचे सहापदरीकरण करून येथील वाहनचालकांना दिलासा देण्यात आला होता. तर या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी या मार्गावरील पुढील टप्पा असलेल्या मुंब्रा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील शिळफाटा जंक्शन येथे सहा पदरी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीच्या माध्यमातून या पुलाची उभारणी केली आहे. या उड्डाणपुलाची तीन मार्गिका असलेली एक बाजू फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण करून सुरु केली होती. यामुळे पनवेल कडे जाणाऱ्या वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला होता. तर या पुलाची तीन मार्गिका असलेली दुसरी बाजू देखील नुकतीच वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. यामुळे बदलापूर ते डोंबिवली येथून कल्याण शीळ मार्गे ठाणे आणि नवी मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळणार असून वेगवान प्रवास करता येणार आहे. यामुळे वाहन चालकांच्या वेळेमध्ये आणि इंधनाचीही बचत होणार आहे.

शीळफाटा सहा पदरी उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

  • एमएमआरडीएच्या माध्यमातून ११९ कोटी रुपयांच्या निधीतून पुलाची उभारणी
  • ७४० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद
Previous Post

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी केला पर्दाफाश

Next Post

नवी मुंबई ‘आरटीओ’ची वर्षभरात ९ हजार ३७३ वाहनांवर कारवाई

Next Post
नवी मुंबई ‘आरटीओ’ची वर्षभरात ९ हजार ३७३ वाहनांवर कारवाई

नवी मुंबई ‘आरटीओ’ची वर्षभरात ९ हजार ३७३ वाहनांवर कारवाई

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.