Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई सेंट्रल पुलाला आता राजमाता अहिल्यादेवींचे नाव! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 26, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई सेंट्रल पुलाला आता राजमाता अहिल्यादेवींचे नाव! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने  गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केवळ 15 महिन्यात पूर्ण केले आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी सांगितले. बृन्हमुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. लोकार्पण कार्यक्रमस्थळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अमिन पटेल, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर,  मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह लोकप्रतिनिधी, महापालिका पदाधिकारी व अन्य संबंधित मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई सेंट्र्ल रेल्वेस्थानकाजवळच्या या १३० वर्ष जुन्या पुलाची कालमर्यादा संपली होती आणि वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय उपुयक्त असलेल्या या पुलाचे पुनर्बांधणी काम गतीने पूर्ण करणे गरजेचे होते. हे लक्षात घेऊन बृहृन्मुंबई महानगरपालिकेने कालबद्ध नियोजनद्वारे अतिशय वेगाने या पुलाची पुर्नबांधणी विहीत मुदतीच्या चार महिने आधी पूर्ण केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग यांचे अभिनंदन मुख्यमंत्री यांनी केले. मुंबईतील अजून जवळपास सहा पूल आता तयार होत असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यात इतर सहा पुलांचे लोकार्पण ही महानगर पालिकेच्या माध्यमातून होईल. महानगरपालिकेत निर्वाचित प्रतिनिधी आल्याने महानगरपालिकेच्या कामाला अधिक गती आणि अधिक लोकाभिमुखता येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, महानगरपालिकेशी चर्चा करुन आपण या पुलाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करणार आहोत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यामाता यांनी या देशामध्ये  एक उत्कृष्ट प्रशासक कसा असला पाहिजे याचा आदर्श आपल्या कामातुन निर्माण केला आहे. त्यांची संवेदनशीलता, धर्मपरायणता, कार्यकुशल प्रजाहितदक्ष राज्यकारभार, कायदा सुव्यवस्थेवर असेलली पकड, त्यांनी तयार केलेली मंदीरे आणि महिलांची पहिली तुकडी, त्यांनी तयार केलेले कारखाने, लघुउद्योग, त्यांनी निर्माण केलेले मंदिरे, घाट, या सर्व कामातून  राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी  आपल्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे तीन दशकांनंतरही त्यांचे नाव आपण  घेतो कारण त्यांच्यासारखे जे  उत्कृष्ट प्रशासक आपल्याकडे होऊन गेले त्यांच्या  कामातून आपली संस्कृती आणि आपली गुणवत्ता आपल्याला आजही पाहायला मिळते. म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यामातेचे नाव या पुलाला देण्याचा निर्णय आपल्या सर्वानाचं अतिशय गौरन्वावित आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन यापुढे राज्य शासन आणि महानगरपालिका कार्य करतचं राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने विहीत मुदतीच्या आत यशस्वरित्या या पुलाचे काम पूर्ण केले आहे.नागरिकांसाठी हा पूल खुप उपयुक्त ठरणारा आहे. सुरळित वाहतुकीसाठी या पुलाची आवश्यकता आहे. त्यापार्श्वभूमीवर महानगरपालिकेने या पुलाचे काम गतीने पूर्ण केले आहे. यासाठी महानगरपालिकेचे अभिनंदन करत उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील अनेक रखडलेले प्रकल्प या शासनाने वेगाने पूर्ण केलेली आहेत. मुंबईकरांना अपेक्षित विकासकामे यापुढेही महानगरपालिका करत राहिल,असा विश्वास व्यक्त करत महानगरपालिकेने  अशाच पद्धतीने गतीने आणि दर्जदार कामे करावीत.

Previous Post

रिलीजच्या काही तास आधी ‘द केरळ स्टोरी २’ला हायकोर्टाचा ब्रेक! २७ फेब्रुवारीचे प्रदर्शन लांबणीवर

Next Post

iPhone युजर्सची ११ वर्षांची प्रतीक्षा संपली! अखेर भारतात ‘Apple Pay’ लाँच होणार

Next Post
iPhone युजर्सची ११ वर्षांची प्रतीक्षा संपली! अखेर भारतात ‘Apple Pay’ लाँच होणार

iPhone युजर्सची ११ वर्षांची प्रतीक्षा संपली! अखेर भारतात 'Apple Pay' लाँच होणार

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.