Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

iPhone युजर्सची ११ वर्षांची प्रतीक्षा संपली! अखेर भारतात ‘Apple Pay’ लाँच होणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 27, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई, राष्ट्रीय
iPhone युजर्सची ११ वर्षांची प्रतीक्षा संपली! अखेर भारतात ‘Apple Pay’ लाँच होणार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भारतातील आयफोन (iphone) वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या ११ वर्षांपासून ज्या सेवेची भारतीय युजर्स वाट पाहत होते, ती ‘Apple Pay’ सेवा आता अखेर भारतात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ॲपल कंपनीने यासाठी भारतात मोठी तयारी सुरू केली असून, विविध बँक आणि कार्ड नेटवर्कसोबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. ॲपलने आपली ‘Apple Pay’ सेवा सर्वप्रथम सप्टेंबर २०१४ मध्ये अमेरिकेत लाँच केली होती. सध्या ही सेवा अमेरिका आणि ब्रिटनसह जगातील ८९ देशांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, भारतीय बाजारपेठेतील गुंतागुंतीचे नियम आणि पेमेंट स्ट्रक्चरमुळे ही सेवा भारतात उपलब्ध नव्हती. आता ११ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर, भारतातील वाढती आयफोन युजर्सची संख्या पाहता ॲपलने ही सेवा लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, ॲपलने या सेवेसाठी भारतातील आघाडीच्या बँकांशी हातमिळवणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये ICICI Bank, HDFC Bank आणि Axis Bank यांसारख्या बँकांचा समावेश आहे. ॲपल पे ही सेवा गुगल पे (Google Pay) आणि सॅमसंग पे (Samsung Pay) प्रमाणेच काम करेल, ज्यामुळे आयफोन युजर्सना डिजिटल पेमेंटचा एक सुरक्षित आणि नवा अनुभव मिळणार आहे.

ॲपल पेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरले जाणारे NFC (Near Field Communication) तंत्रज्ञान :

  • युजर्सना आपला आयफोन किंवा ॲपल वॉच फक्त POS (Point of Sale) मशिनच्या जवळ नेऊन पेमेंट करता येईल.
  • यासाठी कार्ड स्वॅप करण्याची किंवा फिजिकल कार्ड सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.
  • ही सेवा जगभरातील ११,००० पेक्षा जास्त बँका आणि स्थानिक पेमेंट नेटवर्कशी जोडलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात ॲपल पे केवळ कार्ड-आधारित कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी उपलब्ध असेल. मात्र, भारतात युपीआय (UPI) पेमेंटची लोकप्रियता पाहता, कंपनी भविष्यात यामध्ये युपीआय सेवा समाविष्ट करण्याची शक्यता आहे. यासाठी ॲपलला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येणाऱ्या NPCI (National Payments Corporation of India) कडून तांत्रिक मंजुरी घ्यावी लागणार आहे. जर ही मंजुरी मिळाली, तर आयफोन युजर्स थेट ॲपल पे वरूनच स्कॅन करून युपीआय पेमेंट करू शकतील. उद्योगातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ॲपल आपली ही ‘ॲपल पे’ सेवा या वर्षाच्या अखेरीस भारतात अधिकृतपणे लाँच करू शकते. यामुळे भारतात डिजिटल क्रांतीला आणखी वेग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

मुंबई सेंट्रल पुलाला आता राजमाता अहिल्यादेवींचे नाव! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

मिस्टर आणि मिसेस देवरकोंडा!

Next Post
मिस्टर आणि मिसेस देवरकोंडा!

मिस्टर आणि मिसेस देवरकोंडा!

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.