Lokrakshanay
Tuesday, June 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री-माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातील तीन उपक्रमांची गिनीज बुकमध्ये नोंद

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 6, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : बालकांवर संस्कार करून देशाचे भविष्य घडविण्याचे काम शाळांमधून होत असते. स्पर्धात्मक युगात विद्यार्थी मागे राहणार नाही यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी स्वत: लक्ष देत असून २०४७ पर्यंत भारत महासत्ता होण्याच्या प्रधानमंत्री यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने महाराष्ट्र अग्रेसर राहावा यासाठी राज्य शासनामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान नुकतेच राज्यात राबविण्यात आले, या अभियानादरम्यान तीन उपक्रमांचे रेकॉर्ड झाले असून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ च्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह संपूर्ण यंत्रणेचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राज्यात १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. यादरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या शाळांचा पारितोषिक देऊन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री कपिल पाटील, विक्रम काळे, शेखर निकम, राजेश पाटील, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, विजेत्या शाळांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, आई जशी बाळाला लळा लावते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील शाळेचा लळा लागत असतो. या शाळेतील वातावरण आनंददायी असावे तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. याद्वारे ठरविलेले उद्दिष्ट साध्य झाले असून यात एक लाखांहून अधिक शाळांमधून सुमारे दोन कोटी विद्यार्थी सहभागी झाले. त्याचप्रमाणे अभियान कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘वाचन सवय प्रतिज्ञा’, एका दिवसात शिक्षण विषयक हस्तलिखित अभिप्राय अपलोड करणे तसेच वाचनाचे महत्त्व सांगणारा युट्युब वरील व्हिडीओ विद्यार्थी आणि पालकांनी बघणे या तीनही उपक्रमांची दखल घेऊन ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद घेतली गेली ही राज्याच्या दृष्टीने अतिशय गौरवास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. शासनाने नुकताच अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक जनहितार्थ निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, तरुण, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. नुकतीच सुधारित पेन्शन योजना लागू केली आहे, त्यामध्ये शिक्षकांचाही समावेश असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. उद्योग, परकीय थेट गुंतवणूक आदींसह सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आजची पिढी ही उद्याचे भविष्य असल्याने शाळांच्या विकासासाठी विविध निर्णय घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. शाळांना नवीन मान्यता देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. शाळांमधील पायाभूत सुविधा उत्तम असाव्यात यासाठी शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला, यास अनेक उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

Next Post

१.६० कोटीचे ३ किलो सोने मुंबई विमानतळावर जप्त

Next Post
१.६० कोटीचे ३ किलो सोने मुंबई विमानतळावर जप्त

१.६० कोटीचे ३ किलो सोने मुंबई विमानतळावर जप्त

BreakingNews

‘देऊळ बंद २’चा नफा शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडेंचा ऐतिहासिक निर्णय!

मुंबईत मराठी नामफलक मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१२४ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई!

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.