मुंबई : गेल्या तीन दिवसांत विविध १० प्रकरणांत मिळून मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एकूण १ कोटी ६० लाख रुपयांचे सोने पकडले आहे. या सोन्याचे वजन ३ किलो ३ ग्रॅम असून याचसोबत २ आयफोन देखील जप्त करण्यात आले आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात मिळून आतापर्यंत २५ पेक्षा जास्त आयफोन सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहेत.
दुबई, सिंगापूर, सौदी अरेबिया, फुकेट पेधून आलेल्या परदेशी, भारतीय प्रवाशांकडून हे सोने अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. यापैकी फुकेटमधून येणाऱ्या एका विमानातील तस्करीचे प्रकरण इंडिगो कपनीच्या कर्मचा-याने अधिका-यांच्या लक्षात आणून दिले त्या प्रवाशाने हे सोने विमानातील सीटच्या खाली ठेवले होते. तर, अन्य प्रकरणात जे सोने आढळून आले ते प्रामुख्याने बिस्किटांच्या पाकिटात, परिधान केलेल्या कपडयामध्ये, बॅगेतील कपड्यात, रुमालात, ट्रॉली बॅगेत बनावट कप्पे तयार करत ते संपविल्याचे तपासादरम्यान अधिकान्याना आढळले.