KIRAN MANE : बिग बॉस मराठी’ फेम किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. किरण मानेंनी अनेक नाटक आणि गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनयाच्या जोरावर किरण मानेंनी मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. समाजातील घडामोडींवरही माने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात राज्य करणाऱ्या किरण मानेंनी नुकतीच मर्सिडीज कार खरेदी केली आहे.
किरण मानेंनी त्यांच्या मर्सिडीजचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी खास कॅप्शनही दिलं आहे. “ही मोठी गोष्ट नाही. पण, हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. मी तरुण होतो तेव्हा मर्सिडीज माझं स्वप्न होतं. आता ते स्वप्न सत्यात उतरलं आहे. माझी प्रिय मर्सी, वेलकम टू फॅमिली” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. किरण मानेंच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.