Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

राज्यपालांच्या हस्ते न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२६ चे वितरण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 2, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : समाजासमोर असलेल्या विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण या मूल्यांचे जतन करण्याची गरज असून पुरस्कार विजेते हे या मूल्यांचे जिवंत उदाहरण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. आफ्टरनून व्हॉइस”तर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित १८ व्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२६ कार्यक्रमात राज्यपाल श्री.वर्मा बोलत होते. यावेळी संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष पद्मश्री डॉ.संध्या पुरेचा, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, ऑफ्टरनून व्हाईसच्या मुख्य संपादक डॉ.वैदेही तमन तसेच पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यपालांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत उपस्थितांचे स्वागत केले. समाजातील लोकसेवा, कला-संस्कृती, पत्रकारिता, सामाजिक कार्य, शिक्षण आणि नवोन्मेष अशा विविध क्षेत्रांतील योगदानामुळे समाज समृद्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यपाल श्री. वर्मा यांनी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणारे “१८ वे न्यूज मेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२६” हे व्यासपीठ समाजात उच्च आदर्श, जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीची भावना दृढ करणारे असल्याचे सांगितले. यावेळी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, राही भिडे, गायक हरिहरन, अभिनेत्री सुषमा देशपांडे, समाजसेवक दत्ता बारगाजे आणि अभिनेत्री झीनत अमान यांचे राज्यपालांनी विशेष अभिनंदन केले. तसेच २०२६ मधील सर्व “न्यूजमेकर अचिव्हर्स” पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. संगीताच्या माध्यमातून भारतीय संस्कृती समृद्ध करणाऱ्या हरिहरन यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगताना, माहिती अधिकाराद्वारे पारदर्शकता वाढविणाऱ्या विजय कुंभार यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. तसेच योगेंद्र बांगर यांच्या ‘आजीबाईची शाळा’ या उपक्रमाचा उल्लेख करत शिक्षण कोणत्याही वयात व्यक्तीला सक्षम बनवू शकते, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची परंपरा प्रगतिशील विचार, सामाजिक सुधारणा आणि सांस्कृतिक समृद्धीची असल्याचे अधोरेखित करत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आजही महाराष्ट्र उद्योग, प्रशासन आणि सामाजिक विकासात देशाचे नेतृत्व करत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते गायिका उषा मंगेशकर, पद्मश्री गायक हरिहरन, पद्मश्री शेफ संजीव कपूर, अभिनेत्री सुषमा देशपांडे, पत्रकार राही भिडे आणि समाजसेवक दत्ता बारगजे यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Previous Post

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Next Post

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

Next Post
महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

महाराष्ट्रात 'डिजिटल जनगणना २०२७'चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

BreakingNews

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.