Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“हक्काचे पैसे देता येत नसतील तर लाडकी बहीण योजना थांबवा” – उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला कडक आदेश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 10, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
“हक्काचे पैसे देता येत नसतील तर लाडकी बहीण योजना थांबवा” – उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला कडक आदेश
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि हक्काचे पैसे देण्यासाठी निधी नसताना सरकार हजारो कोटींचा खर्च या योजनेवर करत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही, तर ‘पैसे नसतील तर योजना थांबवा,’ असा थेट इशाराच न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सप्टेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेला याआधीही अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. तांत्रिक अडचणी, पोर्टल बंद राहणे आणि चुकीचे पर्याय निवडल्यामुळे अनेक महिलांना प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती. याची दखल घेत ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

मात्र, याच योजनेवरून उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान जोरदार खडाजंगी रंगली. पालिका शिक्षण विभागातील निवृत्त महिलेने सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारे पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि इतर लाभ न मिळाल्याने न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने सरकार आणि पालिकेला फैलावर घेतले. पालिकेच्या वकिलांनी “सरकारकडून निधी मिळाला नाही” असे सांगत जबाब टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर न्यायालयाने ‘लाडकी बहीण’ योजनेवर होणाऱ्या प्रचंड खर्चाकडे बोट ठेवत सरकारच्या प्राधान्यक्रमांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे देण्यासाठी निधी नाही, पण योजनांवर हजारो कोटी खर्च?” असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. यावेळी न्यायालयाचा सूर अधिकच कठोर झाला. “पैसे नसतील तर महापालिकेचे टेबल, खुर्च्या, एसी विकून टाका. आयुक्तांची गाडीही विकावी लागली तरी चालेल, पण कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे द्यायलाच हवेत,” अशा शब्दांत न्यायालयाने पालिकेला खडसावले. तसेच या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकीकडे महिलांसाठी महत्त्वाची मानली जाणारी योजना, तर दुसरीकडे निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकलेले हक्क, या दोन्हींच्या ताणात सरकार अडकलेले दिसत आहे. त्यामुळे आता ‘लाडकी बहीण’ योजनेचे भवितव्य काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

जीवघेण्या गर्दीत आता फेरीवाल्यांचा अडथळा! मध्य रेल्वेच्या ‘त्या’ निर्णयामुळे मुंबईकर संतापले

Next Post

ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांचे हाल! २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Next Post
ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांचे हाल! २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांचे हाल! २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.