Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

जीवघेण्या गर्दीत आता फेरीवाल्यांचा अडथळा! मध्य रेल्वेच्या ‘त्या’ निर्णयामुळे मुंबईकर संतापले

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 10, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
जीवघेण्या गर्दीत आता फेरीवाल्यांचा अडथळा! मध्य रेल्वेच्या ‘त्या’ निर्णयामुळे मुंबईकर संतापले
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मध्य रेल्वेने फेरीवाल्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मध्य रेल्वेवरून कोणत्याही वेळी प्रवास करा प्रवाशांना मात्र गर्दीचा सामना करावाच लागतो. आता अशातच मध्य रेल्वेने फेरीवाल्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने गर्दीने तुडुंब भरणाऱ्या लोकलमध्ये फेरीवाल्यांना अधिकृत परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हार्बर रेल्वेच्या आणि मध्य रेल्वेच्या दोन्हीही मार्गांवर मिळून १०० अधिकृत फेरीवाल्यांचे कंत्राट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे उपनगरीय रेल्वेमध्ये प्रवाशांची आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, २०२३ मध्ये अशाच एका प्रस्तावाला प्रवासी संघटनेकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यावेळी रेल्वेने या निर्णयाविरोधात माघार घेतली होती. मात्र आता पुन्हा प्रवासी संघटनांना विश्वासात न घेता गुपचूप निविदा प्रक्रिया राबवून हे कंत्राट देण्यात आल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि कल्याण दरम्यान, तसेच हार्बर लाईनवरील लोकलमध्ये फेरीवाल्यांना विक्री करण्यासाठी एका खाजगी एजन्सीला तीन वर्षांचे कंत्राट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवस्थेअंतर्गत, मध्य रेल्वेवर ५० आणि हार्बर रेल्वेवर ५० याप्रमाणे १०० अधिकृत विक्रेत्यांना लोकलच्या डब्यांमध्ये उपभोग्य (Consumable) आणि अनुपभोग्य (Non Consumable) अशा दोन्ही वस्तू विकण्याची परवानगी दिली जाईल.मिळालेल्या माहितीनुसार, कागदपत्रांमध्ये आधारकार्डची पडताळणी, पोलीस पडताळणी, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अधिकृत ओळखपत्र जारी करणे यासह कठोर पात्रतेचे निकषही नमूद केले आहेत. या योजनेची अंमलबजावणी प्रगत टप्प्यावर आहे. मार्च महिन्यात बीएमसीने एका विशेष मोहिमेअंतर्गत दादर मार्केटमधून हजारो अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले होते. पण, गेल्या महिन्याच्या ६ मार्च आणि ८ मार्च रोजी, जेव्हा पाहणी केली, तेव्हा अनेक विक्रेते फुटपाथवर धंदा करताना दिसून आले, अशी माहिती मिड- डेने दिलेली आहे. अनेक फेरीवाले बीएमसीची गाडी येताच, तिथून पळ काढतात. आपआपलं सामान घेऊन लगेचच तिकडून पळ काढतात.

Previous Post

अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत भव्य रक्तदान शिबिर संपन्न; प्रत्येक रक्तदात्याला महागडी घड्याळे भेट

Next Post

“हक्काचे पैसे देता येत नसतील तर लाडकी बहीण योजना थांबवा” – उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला कडक आदेश

Next Post
“हक्काचे पैसे देता येत नसतील तर लाडकी बहीण योजना थांबवा” – उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला कडक आदेश

“हक्काचे पैसे देता येत नसतील तर लाडकी बहीण योजना थांबवा” - उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला कडक आदेश

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.