Lokrakshanay
Saturday, October 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘पादचारी प्रथम’ अभियान; दादरमध्ये १२ अतिक्रमणे आणि ६० फेरीवाल्यांवर कारवाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 24, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
‘पादचारी प्रथम’ अभियान; दादरमध्ये १२ अतिक्रमणे आणि ६० फेरीवाल्यांवर कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : पादचाऱ्यांना पदपथांवरून सुरक्षित आणि अडथळामुक्त मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत दादर पश्चिम येथील स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मंडई आणि सेनापती बापट मार्गालगतच्या पदपथांवरील अतिक्रमणांवर शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पदपथांवर अडथळा निर्माण करणारी १२ अनधिकृत बांधकामे, तात्पुरती ताडपत्रीची शेड, अनधिकृत कट्टे हटविण्यात आले, तसेच ६० अनधिकृत फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभियानाचा उद्देश पदपथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सुलभ सार्वजनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. ही कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागामार्फत करण्यात आली.

उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘जी उत्तर’ विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पदपथांवर अनधिकृत बांधकामे, शेड, साहित्य किंवा इतर कोणतेही अडथळे निर्माण करू नयेत. अशा प्रकारचे अतिक्रमण आढळल्यास भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. शहरातील पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, मोकळे आणि वापरण्यायोग्य ठेवण्यासाठी ‘पादचारी प्रथम’ अभियान सातत्याने सुरू राहणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

Previous Post

‘७६ लाख मतांच्या घोटाळ्याप्रकरणी २८ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा’; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात कारवाईची मागणी – प्रकाश आंबेडकर

BreakingNews

‘पादचारी प्रथम’ अभियान; दादरमध्ये १२ अतिक्रमणे आणि ६० फेरीवाल्यांवर कारवाई

‘७६ लाख मतांच्या घोटाळ्याप्रकरणी २८ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा’; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात कारवाईची मागणी – प्रकाश आंबेडकर

स्विगीचे नवे फीचर लॉन्च: एकाच वेळी ५ वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करता येणार

गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी १,५२४ वृक्षांवर कुऱ्हाड? वृक्षतोडीला ‘वॉचडॉग फाउंडेशन’चा तीव्र विरोध

बाल्कनीत कपडे वाळवण्यास बंदी आणि मोकळ्या भूखंडांना हिरवी जाळी बंधनकारक; पुणे पालिकेचा विचार

फटाका स्टॉलसाठी महापालिकेची परवानगी आणि ‘अग्निशामक NOC’ बंधनकारक!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.