Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत भव्य रक्तदान शिबिर संपन्न; प्रत्येक रक्तदात्याला महागडी घड्याळे भेट

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 10, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत भव्य रक्तदान शिबिर संपन्न; प्रत्येक रक्तदात्याला महागडी घड्याळे भेट
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : रक्तदान हे स्वैच्छिक असल्याने रक्तदान शिबिरांमध्ये कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू देणे हे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बेकायदेशीर आहे, असे असताना अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात प्रत्येक रक्तदात्याला नामांकित कंपनीचे जवळपास ३ ते ४ हजार रुपये किमतीचे घड्याळ भेट म्हणून देण्यात आले. शिबिरात जे.जे. महानगर रक्तपेढी, नायर रुग्णालय रक्तपेढी, रेडक्रॉस आणि जे.जे. रुग्णालय रक्तपेढी अशा शासकीय रक्तपेढ्या असतानाही रक्त संक्रमन परिषदेचे नियम धाब्यावर बसविण्यात आले. रिलायन्स समुहाचे अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ग्रँट रोड येथील केनेडी ब्रिजजवळ, नाना चौक येथील अवसर बँक्वेटमध्ये यंगस्टार मित्र मंडळातर्फे अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत असतानाही या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून घड्याळाची भेट मिळवण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे सभागृहामध्ये रक्तदानासाठी लावलेल्या खाटा अपुऱ्या पडल्या.

नामांकित कंपनीचे जवळपास ३ ते ४ हजार रुपयांचे घड्याळ मिळणार असल्याने अवघ्या दोन तासांत या शिबिरामध्ये ४०० नागरिकांनी रक्तदान केले. दुपारी ४ वाजेपर्यंत १५०० नागरिकांनी रक्तदान केले होते. तर सभागृहाबाहेरही मोठ्या प्रमाणात रांगा लागली होती. त्यामुळे हे रक्तदान शिबिराची वेळही वाढविण्याची शक्यता वर्तवली जात होती. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या परिपत्रकानुसार रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांना आयोजकांकडून कोणत्याही प्रकारची भेटवस्तू देण्यात येऊ नये. स्वैच्छिक रक्तदान शिबिरामध्ये आयोजकांकडून रक्तदात्यांना भेटवस्तू दिल्यास संबंधित रक्तपेढीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र असे असतानाही या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या जे.जे. महानगर रक्तपेढी, नायर रुग्णालय रक्तपेढी, जे.जे. रुग्णालय रक्तपेढी या शासकीय रक्तपेढ्यांकडूनच नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत. त्यामुळे या सरकारी रक्तपेढ्यांवर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Previous Post

सर्वांना हसवणाऱ्या ‘दयाबेन’वर दुःखाचा डोंगर! वडिलांच्या निधनाने अभिनेत्रीला शोक अनावर

Next Post

जीवघेण्या गर्दीत आता फेरीवाल्यांचा अडथळा! मध्य रेल्वेच्या ‘त्या’ निर्णयामुळे मुंबईकर संतापले

Next Post
जीवघेण्या गर्दीत आता फेरीवाल्यांचा अडथळा! मध्य रेल्वेच्या ‘त्या’ निर्णयामुळे मुंबईकर संतापले

जीवघेण्या गर्दीत आता फेरीवाल्यांचा अडथळा! मध्य रेल्वेच्या 'त्या' निर्णयामुळे मुंबईकर संतापले

BreakingNews

मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात! १५ ऑगस्टपासून चिपी विमानतळावरून नवी उड्डाणे

रस्त्यावर थुंकल्यास आता मोजावे लागणार तब्बल २००० रुपये; हायकोर्टाची BMCला सक्त ताकीद

ट्रॅफिकमधून सुटका! वर्षाअखेरीस ठाणे-भिवंडी मेट्रो ५ चा पहिला टप्पा सुरू होणार

भेसळखोरांवर FDAचा डिजिटल बडगा; एआय-आधारित ऑनलाइन तक्रार प्रणाली सुरू!

आता Swiggy Instamart वरून LPG सिलिंडरही मिळणार घरपोच; HPCL सोबत भागीदारी

ठाण्यात ‘NAMASTE दिन’ उत्साहात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यावर भर

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.