वृत्तसंस्था : जगभरातील बड्या नेत्यांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सोशल मीडियाच्या जगातही आपलं एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता फक्त राजकारणापुरती मर्यादीत न राहता ती सोशल मीडियावरही त्यापेक्षा जास्त असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. नरेंद्र मोदी यांचे फॅनपेज बरेच आहेत मात्र त्यांच्या वैयक्तीक सोशल मिडिया अकाउंटवरही फॉलोअर्स वाढले आहेत. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
पीएम नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सचा आकडा आता १०० मिलियनपर्यंत पोहोचला आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर १० कोटींहून अधिक लोक त्यांना फॉलो करत आहेत. विशेष म्हणजे, असा ऐतिहासिक टप्पा गाठणारे ते जगातील पहिलेच राजकारणी आणि जागतिक नेते ठरले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगातील इतर पाच प्रमुख नेत्यांच्या एकत्रित फॉलोअर्सपेक्षाही मोदींचा वैयक्तिक आकडा मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. मोदींच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्याने १०० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला असून, अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले जागतिक नेते आणि राजकारणी ठरले आहेत. विशेष म्हणजे, जगातील पहिल्या ५ प्रमुख नेत्यांच्या एकत्रित फॉलोअर्सची संख्या जितकी आहे, त्यापेक्षा एकट्या मोदींच्या फॉलोअर्सची संख्या जास्त आहे.

