Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पतीशी झालेल्या भांडणातून आईने नवजात बाळाला रेल्वे स्थानकावर दिले टाकून

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथील गेट क्रमांक ३ येथे १० महिन्यांचे बाळ आढळून आल्याने खळबळ माजली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 18, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
पतीशी झालेल्या भांडणातून आईने नवजात बाळाला रेल्वे स्थानकावर दिले टाकून
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथील गेट क्रमांक ३ येथे १० महिन्यांचे बाळ आढळून आल्याने खळबळ माजली. यानंतर रेल्वे पोलिसांनी नवजात बाळाला ताब्यात घेऊन कुर्ला पोलिसांना याबाबत माहिती दिली.  घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका महिलेने हे बाळ कपड्यात गुंडाळून रेल्वे स्थानकावर ठेवून निघून गेल्याचे दिसून आले. कुर्ला पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन तिची विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पतीशी झालेल्या वादातून या महिलेने पोटच्या बाळाला रेल्वे स्थानकावर टाकून दिल्याची कबूली दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सपना जैस्वाल असे या महिलेचे नाव आहे. सपना कुर्ला पश्चिम येथील साबळे नगर येथे आपल्या पतीसह भाड्याच्या घरात राहते. सपनाला दोन मुली आणि एक मुलगा आहे. तिचा पती टॅक्सी चालक असून त्यांची आर्थिक परिस्थिती कुमकवत आहे. यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत असे. घटनेच्या दिवशीही सपनाचे तिच्या पतीसह भांडण झाले.त्यानंतर तिने रागाच्या भरात आपल्या एका वर्षाच्या मुलाला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे टाकून दिले आणि याबाबत आपल्या पतीला फोन करून माहिती दिली. परंतु, ती खोटे बोलत असेल, असे तिच्या पतीला वाटले, त्यामुळे तो रेल्वे स्थानकावर गेला नाही.

सपनाचा हेतू मुलाला कायमचा सोडून देण्याचा नव्हता, तर कौटुंबिक वादातून तिने मुलाला रेल्वे स्थानकावर सोडून दिले, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.मात्र, पोलिसांनी सपनाविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईला सुरुवात केली.

 

Previous Post

माथेरानच्या राणीची शीळ ४ महिन्यांनंतर गुंजणार; १ नोव्हेंबरला नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा मुहूर्त ठरला

Next Post

आता रेल्वेचे १२० दिवसां ऐवजी आता फक्त इतकेच दिवस आधी तिकीट आरक्षण करता येणार

Next Post
आता रेल्वेचे १२० दिवसां ऐवजी आता फक्त इतकेच दिवस आधी तिकीट आरक्षण करता येणार

आता रेल्वेचे १२० दिवसां ऐवजी आता फक्त इतकेच दिवस आधी तिकीट आरक्षण करता येणार

BreakingNews

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! तब्बल ६ वर्षांनंतर दया, अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न पुन्हा एकत्र

साईभक्तांच्या श्रद्धेचा महापूर; शिर्डी साई संस्थानला वर्षभरात ६६० कोटींचे योगदान!

जी-७ परिषदेत मोदी-ट्रम्प भेट; भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याची ग्वाही!

साकीनाक्यात एफडीएची धडक कारवाई; २,५१० लिटर संशयित चिली व सोया सॉस जप्त!

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.