Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

दहावीचा गणिताचा पेपर फुटला? टेलिग्रामवर पेपर व्हायरल झाल्याने खळबळ; ग्रुप ॲडमिनसह सदस्यांवर गुन्हे दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 11, 2026
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, पुणे
दहावीचा गणिताचा पेपर फुटला? टेलिग्रामवर पेपर व्हायरल झाल्याने खळबळ; ग्रुप ॲडमिनसह सदस्यांवर गुन्हे दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेदरम्यान गणित विषयाच्या दोन प्रश्नपत्रिका फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. परीक्षेपूर्वीच गणित ‘एक’ आणि ‘दोन’ हे दोन्ही पेपर एका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित झाले. याप्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ग्रुप अॅडमीन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे विभागीय मंडळाचे सहायक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. मंडळाच्या अधिकाऱ्यांना ९ मार्च रोजी एका संशयास्पद टेलिग्राम लिंकची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रुपची तपासणी केली असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या. तपासणीदरम्यान ६ मार्च रोजी झालेल्या ‘गणित भाग-१’च्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र ५ मार्च रोजी रात्री ८ वाजून ३७ मिनिटांनी त्या ग्रुपवर टाकण्यात आल्याचे दिसून आले. तसेच, ९ मार्च रोजी झालेल्या ‘गणित भाग-२’च्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र ६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजून ५६ मिनिटांनी म्हणजे तीन दिवस आधीच ग्रुपवर उपलब्ध असल्याचे आढळून आले. ग्रुपवर प्रसारित झालेल्या प्रश्नपत्रिका आणि मंडळाने अधिकृतरीत्या घेतलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांची पडताळणी केल्यानंतर त्या दोन्ही एकसारख्या असल्याचे निदर्शनास आले. या ग्रुपवर केवळ प्रश्नपत्रिका टाकल्या जात नव्हत्या, तर त्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पैसे देण्यास प्रवृत्त करणारे मेसेजही पोस्ट करण्यात आले होते. ९ मार्च रोजी सायंकाळी ग्रुपवर ‘विज्ञान-१’ व ‘विज्ञान-२’च्या प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा संदेश टाकण्यात आला होता व त्यासाठी एका आयडीवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणातील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Previous Post

रेलनीर गायब! रेल्वे प्रवाशांना आता दुसऱ्या कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्यासाठी मोजावे लागणार जादा पैसे?

Next Post

ऐन लग्नसराईत फटका! १५ मार्चपासून कॅटरिंग ऑर्डर्स बंद करण्याचा व्यवसायिकांचा निर्णय

Next Post
ऐन लग्नसराईत फटका! १५ मार्चपासून कॅटरिंग ऑर्डर्स बंद करण्याचा व्यवसायिकांचा निर्णय

ऐन लग्नसराईत फटका! १५ मार्चपासून कॅटरिंग ऑर्डर्स बंद करण्याचा व्यवसायिकांचा निर्णय

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.