Lokrakshanay
Saturday, August 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय; आता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत

मुंबई लोकलचे पावसाळ्यात बऱ्याचदा वेळापत्रक बिघडते. यावर आता रेल्वेने तोडगा काढला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 12, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय; आता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : रेल्वे रुळांवर जमा होणारा कचरा ही रेल्वे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. यातील थोडा जरी कचरा नाल्यात अडकला तर पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचते. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळं वाहतूक सेवा ठप्प होते. त्यामुळं लोकलचे वेळापत्रक बिघडते. यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे रुळांवर पाणी साचू नये यासाठी सतत उपाययोजना करत असते. मात्र यावेळी मध्ये रेल्वेने रुळांवर फेकला जाणाऱ्या कचऱ्यावर कायमचा तोडगा काढला आहे. मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याणपर्यंत रेल्वे रुळालगत असलेल्या भीतींवर आणखी एक सुरक्षेसाठी कपाउंड लावण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन जवळपासच्या भागात राहणारे लोक रेल्वे रूळांवर कचरा फेकणार आहेत.

रेल्वे रुळांवर फेकला जाणाऱ्या कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी याआधी अशा प्रकारची भिंत विक्रोळी स्थानकात लावण्यात आली होती. या प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने टफन्ड मॉल्डिंग कंपोसाइट संपूर्ण मार्गावर लावण्याचा निर्णय घेतला आहे. लोखंड किंवा स्टीलच्या जाळ्यांच्या तुलनेत टीएमसी अधिक टिकाउ आणि स्वस्त आहे. रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे की, विक्रोळीजवळ सहावी रेल्वे मार्गिकेच्या जवळ रेल्वेच्या संरक्षित भिंतीजवळ पाच मीटरपर्यंत फेसिंग लावण्यात आली आहे. ही फेसिंग १०० मीटरपर्यंत लावण्यात आली आहे. सीएसएमटी ते कल्याणपर्यंत जवळपास ६० किमीच्या मार्गिकेवर टीएमसी फेसिंग लावण्यात आली आहे. हे काम पुढच्या ६ महिन्यात पूर्ण होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या आधी काही ठराविक व महत्त्वाच्या जागांवर ही संरक्षक जाळी बसवण्याचे काम प्राथमिक स्तरावर करण्यात येणार आहे. यात मस्जिद, डोंगरी, करी रोड, सायन, कुर्ला आणि भांडुप या स्थानकांत पहिले काम केले जाणार आहे.  रेल्वे प्रशासनानुसार, रेल्वे रुळांवर फेकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या खूप जुनी आहे. अनेकदा कारवाई करुनही कचरा फेकण्यात येतोच. मध्य रेल्वेकडून दरवर्षी या समस्येसाठी २.७२ कोटींचा खर्च केला जातो. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बसवण्यात येणाऱ्या संरक्षक जाळ्यांची रीसेल व्हॅल्यू खूप कमी आहे त्यामुळं चोरी होण्याचा कोणताच धोका नाहीये.  रेल्वेने रुळांनजीक दोन्ही बाजूने भिंत बांधली आहे. खरं तर बी भिंत नसून स्टीलच्या पत्र्याचे कुंपण घातले आहे. २०२३ मध्ये रेल्वेने मान्सून पूर्व तयारीसाठी रुळाजवळील जवळपास ८० हजार मेट्रिक टन कचरा साफ केला आहे. या वर्षी मान्सून पूर्व कामे लवकर सुरू होणार आहेत. मध्य रेल्वेने कचरा साफ करण्यासाठी जुन्या लोकल ट्रेन कन्व्हर्ट केले आहेत. जे आता स्वच्छता रथ नावाने चालवल्या जातात. 6 डब्ब्याच्या या ट्रेनमध्ये जवळपास ६० टन कचरा प्रति कोच राहतो. कचरा रिसायकलिंग प्लांट २५० किलो प्रती दिन कचरा रिसायकल करण्याची क्षमता आहे.

Previous Post

अनधिकृत बांधकामांवर जीपीएस माध्यमातून ठेवणार नजर

Next Post

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश; पावसापूर्वी कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करा

Next Post
आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश; पावसापूर्वी कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करा

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश; पावसापूर्वी कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करा

BreakingNews

साखर महागल्याने चहाही कडू; कटिंगपासून फुल चहापर्यंत दरवाढ!

दहीहंडी उत्सव तोंडावर पण मातीच्या हंड्यांची विक्री ठप्प; सांगवी कुंभारवाड्यातील कारागीर चिंतेत!

गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत मेट्रो सेवा; रविवारचा ‘मेगा ब्लॉक’ही रद्द! – मंत्री मंगल प्रभात लोढांची घोषणा

अमित ठाकरे यांचा कल्याण-डोंबिवली महाविद्यालय दौरा; विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन

नव्या इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग पॉईंट अनिवार्य; जुन्या सोसायट्यांनाही सवलत!

मिशन २०३० : राज्यातील भटक्या कुत्र्यांना मिळणार ‘क्यूआर कोड’; महापालिकेचे रेबीजमुक्तीकडे पाऊल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.