Lokrakshanay
Saturday, July 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानची तिसरी लग्नगाठ!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 6, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानची तिसरी लग्नगाठ!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी अखेर ५ जुलै २०२६ रोजी कुटुंबीय, जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने विवाह नोंदणी करून वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विवाहाची चर्चा सुरू होती. हा समारंभ अत्यंत खासगी स्वरूपात पार पडला. आमिर खान यांचा हा तिसरा विवाह असून, वयाच्या ६१व्या वर्षी त्यांनी पुन्हा संसार थाटला आहे. त्यामुळे गौरी स्प्रॅट कोण आहेत, त्यांचे वय किती आहे आणि दोघांच्या वयात किती अंतर आहे, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे. आमिर आणि गौरी यांची ओळख तब्बल २५ वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर काही काळ दोघांचा संपर्क तुटला. मात्र, सुमारे दोन वर्षांपूर्वी आमिर यांच्या चुलत बहिणी नुझहत हिच्या माध्यमातून दोघांची पुन्हा भेट झाली. या भेटीनंतर त्यांची मैत्री अधिक दृढ झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. मार्च २०२५ मध्ये आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आमिर यांनी गौरीची प्रथमच सर्वांसमोर ओळख करून देत त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती दिली होती.

गौरी स्प्रॅट या मूळच्या बंगळुरू येथील असून त्यांनी लंडनमधील कला विद्यापीठातून फॅशन, शैलीरचना आणि छायाचित्रण या विषयांचे शिक्षण घेतले आहे. त्या व्यावसायिक केशभूषाकार असून सौंदर्य, फॅशन आणि आरोग्यवर्धन क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका आहेत. सध्या त्या आमिर खान यांच्या चित्रपट निर्मिती संस्थेत कार्यरत आहेत. गौरी या एका मुलाच्या आई आहेत. उपलब्ध माहितीनुसार, त्यांचे वय ४६ वर्षे असून आमिर खान ६१ वर्षांचे आहेत. त्यामुळे दोघांच्या वयात १५ वर्षांचे अंतर आहे. विवाहापूर्वी आमिर यांनी गौरीमुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सांगितले होते. रिना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबतच्या आठवणी सुंदर असल्याचे नमूद करत, गौरीच्या सहवासात आपल्याला मानसिक शांतता आणि कौटुंबिक आनंद लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या विवाहानंतर चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या नव्या वैवाहिक आयुष्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Previous Post

आषाढी वारीवर पुराचे संकट; वारकऱ्यांना ‘नो एन्ट्री’!

Next Post

रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळेच झाडे पडली असे म्हणणे चुकीचे, हवामानही तितकेच कारणीभूत! – आयुक्त अश्विनी भिडे

Next Post
रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळेच झाडे पडली असे म्हणणे चुकीचे, हवामानही तितकेच कारणीभूत! – आयुक्त अश्विनी भिडे

रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळेच झाडे पडली असे म्हणणे चुकीचे, हवामानही तितकेच कारणीभूत! - आयुक्त अश्विनी भिडे

BreakingNews

“रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचे का?” एफडीएच्या धडक कारवाईवर मुंबई हायकोर्टाचे संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंद; आयएमएचा २४ तास वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय

सोमवारपासून मध्य रेल्वे धावणार नव्या गतीने; १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या २२ वरून ३२ वर

ठाण्यातील सहा अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद; प्रदूषणातून नागरिकांना दिलासा!

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.