Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

लाहोरमध्ये जन्म, मुंबईत अखेरचा श्वास! ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 14, 2025
in मनोरंजन, मुंबई
लाहोरमध्ये जन्म, मुंबईत अखेरचा श्वास! ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक पिढ्यांना भुरळ घालणाऱ्या सुवर्णकाळातील दिग्गज अभिनेत्री कामिनी कौशल यांचे ९७व्या वर्षी निधन झाले. अलीकडेच त्या आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा मध्ये आणि कबीर सिंहमध्ये शाहिद कपूरच्या आजीच्या भूमिकेत झळकल्या होत्या. कामिनी कौशल या १९४० च्या दशकातील अत्यंत प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक होत्या. १९४७ आणि १९४८ या सलग दोन वर्षांमध्ये बॉक्स ऑफिस इंडियाच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये त्या पहिल्या क्रमांकावर होत्या. २०२२ मध्ये आउटलुक इंडियाने प्रसिद्ध केलेल्या ‘७५ सर्वोत्तम अभिनेत्रींच्या यादीतही त्यांना मानाचा दर्जा मिळाला.

कामिनी कौशल यांचा जन्म १६ जानेवारी १९२७ रोजी लाहोर येथे झाला. त्यांनी अगदी लहान वयात ऑल इंडिया रेडिओवर कार्यक्रम करायला सुरुवात केली होती. लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात बीए (ऑनर्स) पूर्ण केल्यानंतर, १९४६ मध्ये चेतन आनंद यांनी नीचा नगरमधून त्यांना हिंदी चित्रपटांत पदार्पणाची संधी दिली. करिअरच्या कालावधीत दो भाई, नदिया के पार, जिद्दी, शबनम, उपकार, पूरब और पश्चिम, रोटी कपड़ा और मकानसह अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांनी दिलीप कुमार, राज कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही पडद्यावर काम केले होते.

Previous Post

मराठी चित्रपट ‘गोंधळ’ झळकणार आंतरराष्ट्रीय पातळीवर!

Next Post

“आपल्याच माणसांनी खाली खेचण्याचा प्रयत्न केला” – हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे

Next Post
“आपल्याच माणसांनी खाली खेचण्याचा प्रयत्न केला” – हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे

“आपल्याच माणसांनी खाली खेचण्याचा प्रयत्न केला” – हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे

BreakingNews

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; मे महिन्याचा हप्ता १२ ते १५ जूनदरम्यान खात्यात जमा होणार!

पुण्यात भाडे नाकारणाऱ्या ४८४ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; ९ जण निलंबित!

ठाण्यातील अनेक भागांत शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद!

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.