Lokrakshanay
Saturday, May 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

महादेव बेटिंग ॲपप्रकरणी पुण्यात मोठी कारवाई; ९० जण ताब्यात

महादेव बेटिंग ॲपप्रकरणी पुण्यातील नारायणगावात छापामारी करण्यात आली असून ९० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. महादेव बेटिंग ॲपचं महराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर एकच चर्चा आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 16, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, पुणे
महादेव बेटिंग ॲपप्रकरणी पुण्यात मोठी कारवाई; ९० जण ताब्यात
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : जगभरात प्रसिद्ध असलेल्या महादेव बेटिंग ॲप मनी लॉन्ड्रींग घोटाळ्याची लिंक आता पुणे जिल्ह्यातील नारायणगावपर्यंत येऊन पोहचली आहे. या बॅटिंगसाठी नारायणगाव येथील संपूर्ण बिल्डिंग वापरण्यात येत होती, अशी माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकल्यानंतर हे प्रकरण समोर आले. यात पोलिसांनी जवळपास ९० जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महादेव बेटिंग प्रकरण समोर आले तेव्हा देशातील विविध राज्यांसह परदेशातही कारवाई करण्यात आली होती. आता याच प्रकरणी नारायणगावात पोलिसांनी कारवाई करत याचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आणल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महादेव बुक आणि लोटस ३६५ या दोन वेबसाईट संबंधित पेमेंटचे प्रोसेसिंग या ठिकाणाहून होत होते. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यात मुख्य सूत्रधार म्हणून नारायणगाव आणि जुन्नर येथील दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी ही बॅटिंग सुरू होती. सध्या सर्वांवर पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी देखील राज्यभरात अशा कारवाया केल्या गेल्या आहेत. या कारवाईचे धागे कुठपर्यंत पोहचतात हे तपासाअंती समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नारायणगाव येथील मुख्य भागात ही छापेमारी झाल्याने संपूर्ण जुन्नर तालुका या घटनेने हादरला आहे. सध्या पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रोसेस सुरू आहे. दोन – तीन दिवसांत यात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

२२९० मतदारांनी मुंबई उपनगरात बजावला गृहमतदानाचा हक्क

Next Post

ड्रेन मास्टर यंत्राचा वसई विरार महापालिकेडून नालेसफाईसाठी वापर

Next Post
ड्रेन मास्टर यंत्राचा वसई विरार महापालिकेडून नालेसफाईसाठी वापर

ड्रेन मास्टर यंत्राचा वसई विरार महापालिकेडून नालेसफाईसाठी वापर

BreakingNews

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.