विरार : वसई विरार मधील नाले सफाईचा विषय पावसाळ्यात शहरात पाणी भरल्यावर दरवर्षी चर्चेला जात असतो. त्यामुळे यावेळी पालिकेने शहरातील नाल्यांच्या सफाईसाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री मागवूनत्या द्वारे नाले सफाईल सुरुवात केली आहे. वसई विरार महापालिकेने शहरातील नाल्यांची सफाई करण्यासाठी ड्रेन मास्टर ही अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणली असून त्याद्वारे नाल्यांची साफसफाई करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पोकलेन मशीन किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणच्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात आहे. अशा प्रकारची यंत्रसामुग्री वापरणारी दिल्ली नंतरची वसई विरार ही दुसरी महानगरपालिका ठरली आहे. पालिकेने आता पर्यंत ६८% नाले सफाई झाल्याचा दावा केला आहे. सध्या वसई विरार महापालिकेकडून शहरातील नाल्याची साफसफाई करण्यात येत आहे. त्यासाठी ९ प्रभागात नालेसफाईचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आजपर्यंत एकूण ६८% नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. नालेसफाई करताना ज्या ठिकाणी पोकलेन यंत्र किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी पाण्यातून किंवा दलदलीच्या भागातून गाळ काढण्यासाठी पालिकेने ड्रेन मास्टर या आधुनिक यंत्राचा वापर सुरू केला आहे. ड्रेन मास्टर यंत्रांला उभयचर प्रकारचे यंत्र असे म्हणतात. हे यंत्र पाण्यावर तरंगून तसेच जमिनीवरून किंवा ड्राय नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम करते. या ड्रेन मास्टर नावाच्या एका यंत्राची किंमत १ लाख ७४ हजार असून पालिकेने १५ व्या वित्त आयोगातून ३ लाख ४८ हजारांची दोन ड्रेन मास्टर यंत्रे विकत घेतली आहे.
याबाबत माहिती देताना पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले की, नाल्यांमधील गाळ यांत्रिक पद्धतीने काढण्यासाठी आम्ही ड्रेन मास्टर या यंत्राचा वापर करत आहोत. हे यंत्र कॉम्पॅक्ट स्वरूपाचे असून त्यामुळे नाल्यातील गाळ पूर्णपणे काढून टाकला जात आहे. दलदलीच्या भागात व जास्त पाण्याचा ठिकाणी हे यंत्र चेन स्प्रॉकेटने सहज काम करत आहे. मोदींची गॅरंटी या यंत्रामध्ये गाळ गोळा करण्यासाठी विशेष प्रकारची बीन्स यंत्रावरच उपलब्ध करून दिलेली आहेत, यामुळे ज्या नाल्यांच्या धक्क्यावर इमारती आणि घरे आहेत अशा ठिकाणी नाले साफ करणे खूप शक्य झाले आहे. या यंत्रामुळे हायड्रॉलिक लेग आणि काही गाळ वाहत्या पाण्यात अडकल्यामुळे, यंत्र पाण्यात स्थिर करून ते काढले जात आहे. शहरात सध्या नालेसफाईचे काम जोरात सुरू असून या यंत्रांच्या माध्यमातून नालेसफाई अधिक परिणामकारक होत आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (घनकचरा) नानासाहेब कामठे यांनी दिली. दिल्ली महापालिकेत या ड्रेन मास्टर यंत्राचा वापर करून नालेसफाई केली जात आहे. दिल्ली नंतर अशा यंत्राचा वापर करणारी वसई विरार ही दुसरी महापालिका ठरली आहे.