नवी मुंबई : ड्रग्ज आणि बेकायदशीर पद्धतीने राहणाऱ्या कथीत नायजेरियन नागरिकांस पोलिसांनी छापा टाकून पकडले. त्याला ताब्यात घेतले. मात्र, या नायजेरियन व्यक्तीने धक्कादायक रित्या पोलिसांच्या तावडीतून पलायन.
संधी मिळताच नायजेरीयन नागरिकाने नवी मुंबई पोलिसांच्या तावडीतून धूम ठोकली; बेकायदेशीर वास्तव्य व ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलिसांकडून कारवाई..#navimumbai #PoliceState pic.twitter.com/ikM86f2McC
— दै. लोकरक्षणाय (@lokrakshanay) October 7, 2023
सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते की, आरोपीला एका पोलिसाने पकडून ठेवले आहे. पोलीस आरोपीला घेऊन व्हॅनच्या दिशेने निघाले असता तो अचानक पळून जातो. हातातून निसटलेल्या आणि धावत सुटलेल्या आरोपीमागे पोलीसही धावकात. त्यातला एक पोलीस धावताना पडल्याचे पाहायला मिळते. नंतर काही पोलीस त्याच्या पाठिमागे धावत आहेत. मात्र, आरोपीने यशस्वी गुंगारा दिल्याचे दिसते आहे. पुढे या आरोपीला पकडण्यात आले किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.