Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाखोंची कमाई, १ मिलियन सबस्क्रायबर्स असूनही अर्चना पूरण सिंहचा युट्यूबला रामराम!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 11, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
लाखोंची कमाई, १ मिलियन सबस्क्रायबर्स असूनही अर्चना पूरण सिंहचा युट्यूबला रामराम!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ आपल्या हसण्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री अर्चना पूरण सिंह सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. अर्चना आणि तिच्या कुटुंबाचे ‘आप का परिवार’ हे यूट्यूब चॅनेल अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झालं होतं. मात्र, १० लाखांहून अधिक (१ मिलियन) सबस्क्रायबर्स आणि दरमहा लाखोंची कमाई होत असतानाही, अर्चनानं हे चॅनेल तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर गेल्या काही वर्षात अनेक मोठे सेलिब्रिटी युट्यूबर झाल्याचं पाहायला मिळालं. यात अर्चना पूरण सिंहच्या व्लॉगची विशेष चर्चाही होत असे. पण आता तिनं अचानक युट्यूब व्लॉगिंगमधून ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे.

अर्चना पूरण सिंहनं पती परमीत सेठी आणि मुलांसोबत (आर्यमन आणि आयुष्मान) एका विशेष व्हिडिओद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. अर्चना म्हणाली, “ही कोणतीही वाईट बातमी नाहीये, पण आम्हाला वाटलं की हे आमच्या चाहत्यांशी शेअर करावं. आम्ही जवळपास दीड वर्षापूर्वी हे चॅनेल सुरू केलं होतं. पण आता आम्हाला थोडा वेळ विश्रांती हवी आहे. आम्ही काही आठवड्यांचा ब्रेक घेत आहोत.” अर्चनानं पुढं स्पष्ट केलं की, सतत व्हिडिओ पोस्ट करण्याच्या कामातून त्यांना थोडा ‘क्रिएटिव्ह ब्रेक’ हवा आहे जेणेकरून ते नव्या ऊर्जेनं आणि नवीन कल्पनांसह पुन्हा परत येऊ शकतील. मिळालेल्या माहितीनुसार, अर्चनाच्या या चॅनेलला १.१८ मिलियनहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. या चॅनेलवर तिने कपिल शर्मा शोच्या सेटवरील पडद्यामागचे (BTS) व्हिडिओ आणि आपल्या कौटुंबिक आयुष्यातील मजेशीर किस्से शेअर केले होते. या चॅनेलच्या माध्यमातून त्यांना दरमहा ४ ते ६ लाख रुपयांपर्यंतची कमाई होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. परमीत सेठीनं एका मुलाखतीत गंमतीनं म्हटले होते की, “जर आम्ही हे काम पूर्णवेळ करिअर म्हणून केलं, तर आम्हाला चित्रपट आणि टीव्हीपेक्षा तीनपट जास्त पैसे मिळतील.” अर्चनानं तिचं मुख्य चॅनेल थांबवलं असलं तरी, तिचा मुलगा आर्यमन सेठी (AARY Vlogs) याचं यूट्यूब चॅनेल सुरू राहणार आहे. अर्चना आणि परमीत अधूनमधून आर्यमनच्या व्ह्लॉग्समध्ये दिसणार आहेत, त्यामुळं चाहत्यांना त्यांची कमतरता भासणार नाही.

Previous Post

ऐन लग्नसराईत फटका! १५ मार्चपासून कॅटरिंग ऑर्डर्स बंद करण्याचा व्यवसायिकांचा निर्णय

Next Post

टंचाई की काळाबाजार? ठाण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागतायत ४ ते ५ हजार रुपये; हॉटेल मालकांचा संताप

Next Post
टंचाई की काळाबाजार? ठाण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागतायत ४ ते ५ हजार रुपये; हॉटेल मालकांचा संताप

टंचाई की काळाबाजार? ठाण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागतायत ४ ते ५ हजार रुपये; हॉटेल मालकांचा संताप

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.