Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

टंचाई की काळाबाजार? ठाण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागतायत ४ ते ५ हजार रुपये; हॉटेल मालकांचा संताप

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 12, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
टंचाई की काळाबाजार? ठाण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागतायत ४ ते ५ हजार रुपये; हॉटेल मालकांचा संताप
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत ठाण्यात गॅसचा काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. यामध्ये काही टोळ्या सक्रिय झाल्या असून १ हजार ८०० रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलिंडर हा काळाबाजारात चार ते पाच हजाराला विक्री केला जात असल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे.

गॅसचा पुरवठा कमी झाल्यानं रविवारपर्यंत शहरातील ८० टक्के हॉटेल बंद राहणार असल्याचं हॉटेल मालकांनी सांगितलं. प्रशासनाकडून एक महिना पुरेल इतका गॅस उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे. असे असले तरी काळाबाजारात दुप्पट पैसे घेऊन गॅसची विक्री केली तर गॅस शिल्लक राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ठाण्यातील ३० टक्के हॉटेल व्यवसायिकाकडे पाईपलाईन गॅस आहेत. तर उर्वरित ७० टक्के हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरतात. दरम्यान, काळाबाजारातील विक्रीवर सरकारनं नियंत्रण आणले नाही तर रविवारपर्यंत ठाण्यातील ८० टक्के हॉटेल बंद पडतील, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी ठाणे हॉटेल अससोसिएशनचे अध्यक्ष उमेश शेट्टी यांनी सर्वच हॉटेल व्यावसायिकांशी बैठक घेऊन यावर सरकारनं तोडगा काढण्याची मागणी केली. छापा मारून काळ्या बाजारात विक्री बंद करावी- ठाणे, मुंबई भागात आलेल्या पर्यटक, व्यावसायिक, आयटी कर्मचारी तसेच कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं काळाबाजारात गॅसची विक्री करणाऱ्यांवर छापा मारावा. तसेच काळाबाजारातील गॅस विक्री बंद करावी, अशी मागणी ठाणे हॉटेल अससोसिएशनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली आहे. ठाणे महापालिकेच्या एका तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यानं हॉटेल व्यावसायिकाना पाईप लाईननं गॅस पुरवठा करण्यास विरोध केला होता. त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांना परवानगी दिली नाही. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे.

Previous Post

लाखोंची कमाई, १ मिलियन सबस्क्रायबर्स असूनही अर्चना पूरण सिंहचा युट्यूबला रामराम!

Next Post

पालकांचे टेन्शन संपले! १३ वर्षांखालील मुलांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आता पालकांची ‘नजर’

Next Post
पालकांचे टेन्शन संपले! १३ वर्षांखालील मुलांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आता पालकांची ‘नजर’

पालकांचे टेन्शन संपले! १३ वर्षांखालील मुलांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आता पालकांची 'नजर’

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.