Lokrakshanay
Saturday, June 13, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

हॉटेल व्यावसायिकांनाही भेडसावतेय पनीरची कमतरता

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 12, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!
Share on FacebookShare on Whatsapp

अहिल्यानगर : राज्यात दुधाच्या संकलनात झालेल्या घटेचा परिणाम आता दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारावर दिसू लागला आहे. विशेषतः खवा आणि पनीरच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली असून, गेल्या काही काळात किलोमागे ८० ते १०० रुपयांपर्यंत दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. यापूर्वी २८० ते ३०० रुपये किलो दरम्यान विकला जाणारा खवा आता ३८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दुधाचा पुरवठा घटल्याने खवा आणि पनीर उत्पादनावर परिणाम झाला असून बाजारात या पदार्थांची उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना आगाऊ मागणी नोंदवूनच माल मिळवावा लागत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम नसल्याने मागणी तुलनेने सामान्य असली तरी पुरवठा कमी असल्याने दरांवर दबाव कायम आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात एकेकाळी दुधाचे संकलन ४० लाख लिटरपर्यंत पोहोचले होते. मात्र अलीकडील काळात त्यामध्ये झालेल्या घटेमुळे दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांनाही पनीरच्या कमतरतेचा सामना करावा लागत असून येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या गायीच्या सुमारे ६ लिटर दुधापासून एक किलो शुद्ध खवा तयार होतो. सध्या गायीच्या दुधाचे दर ३८ ते ४० रुपये प्रतिलिटर असल्याने केवळ दुधाचाच खर्च सुमारे २४० रुपये येतो. यामध्ये इंधन, मजुरी आणि इतर उत्पादन खर्चाची भर पडत असल्याने खवा ३०० रुपयांपेक्षा कमी दराने विकणे व्यवहार्य ठरत नाही. त्याचप्रमाणे एक किलो पनीर तयार करण्यासाठी सुमारे ७ ते ८ लिटर दुधाची आवश्यकता असते. त्यामुळे दुधाच्या वाढत्या खर्चाचा थेट परिणाम पनीरच्या किमतीवरही होत असल्याचे बाजारातील जाणकारांचे मत आहे.

Previous Post

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

BreakingNews

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

ठाण्यात २८ जून रोजी पल्स पोलिओ मोहिमेसाठी तयारी; दोन लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट!

जनगणना संपताच शिक्षकांचे प्रशिक्षण पुन्हा सुरू; शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जारी!

एसटी कर्मचाऱ्यांचा २९ जूनपासून बेमुदत ‘चक्का जाम’चा इशारा!

पेट्रोल-डिझेल खरेदीवर केंद्र सरकारचे नवे निर्बंध; ९० दिवसांसाठी नियम कडक!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.