Lokrakshanay
Tuesday, September 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नवी मुंबईत देशभक्तीसोबतच आरोग्याचा जागर; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला जोडली आरोग्याची पाऊले

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 7, 2026
in ताज्या बातम्या, नवी मुंबई, महाराष्ट्र
नवी मुंबईत देशभक्तीसोबतच आरोग्याचा जागर; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला जोडली आरोग्याची पाऊले
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या अनुषंगाने सुपर स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील विविध दुर्लक्षित भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, त्यासोबतच नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सोसायट्या आणि वसाहतींमध्ये कचऱ्याचे चार प्रकारे वर्गीकरण करण्याची माहिती रहिवाशांना देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या अंतर्गत घणसोली सेक्टर ३० येथील यशोदीप हाइट्स सोसायटी तसेच सेक्टर ८ येथील गामी रिजन सोसायटीमधील रहिवासी आणि स्वच्छताकर्मींना कचरा वर्गीकरणाची माहिती देण्यात आली. तसेच सेक्टर ६, समर्थनगर, घणसोली परिसरात स्वच्छता मोहिमेसोबतच आरोग्य विभागाच्या वतीने मलेरिया आणि डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. परिसराची स्वच्छता करताना पाणी साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी उघड्यावर पडलेले टायर्स आणि इतर अनावश्यक साहित्य जमा करण्यात आले. करावेगाव, आग्रोळीगाव, दिघा विभागातील व्यावसायिक क्षेत्र, सेक्टर १६ मधील जय भवानी मार्केट, ऐरोली, जुहूगाव आणि महापेगाव या भागांतही अशाच प्रकारच्या विशेष स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या. त्यामुळे स्वच्छतेसोबतच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेकडून व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत.

‘सफाई अपनाओ–बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सखोल स्वच्छता मोहिमा, तर आरोग्य विभागामार्फत मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधात्मक तसेच मूषक नियंत्रण मोहिमा संयुक्तपणे राबविण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली या विशेष मोहिमा राबविण्यात येत असून, नागरिकांकडूनही या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आपल्या घरात तसेच घराभोवती पाणी साचून राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. घराभोवती साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी टायर्स, प्लास्टिकच्या वस्तू, भांडी किंवा इतर साहित्यामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ताप किंवा इतर तापसदृश्य लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी विलंब न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा. नवी मुंबई शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या मोहिमांसोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

जिजाऊ संस्थेचा शैक्षणिक उपक्रम; पिवळी केंद्रातील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वाटप

Next Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले स्वागत

Next Post
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले स्वागत

BreakingNews

आता रिक्षात बसण्यापूर्वीच कळणार भाडे; ठाणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवेला सुरुवात!

राजा शिवछत्रपती मंडळाचा ‘माऊली… एक दिव्य प्रवास’ देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची भररस्त्यात चाकूने हत्या; मुख्य सूत्रधारासह ७ आरोपींना अटक

उल्हास नदीला मिळाले ‘जीवनदान’; गणेशोत्सवात तब्बल २,०७० किलो निर्माल्य संकलित!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.