Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 20, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तयार करून देश-विदेशातील घाऊक बाजारपेठेत विक्री करणाऱ्या कंपनीने अचानक अनेक वर्षांच्या व्यवहाराचे फॉरेन्सिक ऑडिट केले. यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याची तब्बल वीस कोटी रुपयांची लबाडी उघडकीस आली. या अधिकाऱ्याने कच्च्या मालाचे टेंडर अधिक दराने स्वीकारत अतिरिक्त आलेली रक्कम कंपनीला न देता स्वतः वापरत अनेक मालमत्ता खरेदी केल्या. हा प्रकार लक्षात आला, त्यावेळी कंपनीने या अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीडीएस लिमिटेड’ या कंपनीच्या बांगलादेश, यू. के. तसेच इतर देशांत शाखा आहेत. ही कंपनी देश-विदेशात वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तयार करून त्यांची विक्री करते. यातील बहुतांश कपडे बांगलादेशमध्ये बनतात. बांगलादेशमध्ये कंपनीचा संचालक म्हणून दीपक कसाना या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती. २०१२ पासून कंपनीचे पुरवठादार ठरविणे, त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचा दर ठरवणे असे सर्व निर्णयाधिकार कसाना यांना देण्यात आले होते. कंपनीच्या बांगलादेश येथील आर्थिक व्यवहारात काहीतरी घोटाळा असल्याचा संशय कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांना आल्याने त्यांनी अचानक कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे ठरविले. एका नामांकित कंपनीच्या वतीने हे ऑडिट करण्यात आले. या ऑडिटमध्ये सर्व निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या दीपक कसाना यांनीच गैरव्यवहार केल्याचा अहवाल कंपनीने दिला. त्यानुसार कसाना यांनी २५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. कसाना यांचा लॅपटॉप, मोबाइल तसेच ई-मेल आयडी आणि बँक खाती यांची झाडाझडती घेतली असता, आतापर्यंत कंपनीचे २० कोटी रुपये त्यांनी स्वतःसाठी वापरल्याचे उघड झाले आहे. माल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून कमी दरात कपडा घेऊन कंपनीला मात्र जास्त दर लावल्याचे भासविण्यात आले. अतिरिक्त रक्कम कसाना यांनी खर्च करून त्यातून देश-विदेशात नऊ मालमत्ता खरेदी केल्या. हा प्रकार लक्षात येताच कसाना यांच्याविरुद्ध अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Next Post

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

Next Post
पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार 'खारघर कोस्टल रोड', ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.