Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

रिलीजच्या काही तास आधी ‘द केरळ स्टोरी २’ला हायकोर्टाचा ब्रेक! २७ फेब्रुवारीचे प्रदर्शन लांबणीवर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 26, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
रिलीजच्या काही तास आधी ‘द केरळ स्टोरी २’ला हायकोर्टाचा ब्रेक! २७ फेब्रुवारीचे प्रदर्शन लांबणीवर
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : ‘द केरल स्टोरी २’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच ‘द केरल स्टोरी २’ चित्रपटाच्या निर्मात्यांना केरळ उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. उद्या २७ फेब्रुवारीला चित्रपट रिलीज होणार होता मात्र आता न्यायालयाने चित्रपटाला स्थगिती दिली आहे.

‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादात अडकला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, केरळ राज्यांविषयी अचूक सादरीकरण करण्यात आले आहे. कोर्टामध्ये या चित्रपटाविषयीच्या तीन याचिका दाखल झाल्या आहेत ज्यामध्ये चित्रपटाचे सेन्सर सर्टिफिकेट रद्द करण्याची आणि चित्रपट रिलीज होऊ नये अशी मागणी होत आहे. न्यायालयाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ला याचिकाकर्त्याच्या याचिकेवर विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी पुढच्या दोन आठवड्यांमध्ये या प्रकरणावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. सीबीएफसीचे नवीन आदेश जारी होईपर्यंत, न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत चित्रपटाच्या काही भागांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे, ज्यात चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी देखील आहे. याचिका कर्त्यांचे म्हणणे आहे की, ‘द केरल स्टोरी २’ हा चित्रपट केरळ राज्याविषयी चुकीचे माहिती सादर करत आहे. यामुळे समाजात जातीय तणाव देखील होऊ शकतो. ‘द केरल स्टोरी २’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरल स्टोरी २’ चा दुसरा भाग आहे. पहिला चित्रपटही वादग्रस्त होता, पण त्यामुळे या चित्रपटाची मोठी कमाई झाली. विपुल अमृतलाल शाह निर्मित ‘द केरल स्टोरी 2’ चे दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केले . हा चित्रपट २७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

 

Previous Post

सेलिब्रेटींनाही टाकले मागे! पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सचा आकडा १०० मिलियनवर

Next Post

मुंबई सेंट्रल पुलाला आता राजमाता अहिल्यादेवींचे नाव! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
मुंबई सेंट्रल पुलाला आता राजमाता अहिल्यादेवींचे नाव! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई सेंट्रल पुलाला आता राजमाता अहिल्यादेवींचे नाव! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.