वृत्तसंस्था : तंत्रज्ञानाच्या विश्वात मोठा बदल घडवणारी बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ‘ऑनर’ जगातील पहिला AI Robot Phone बाजारात आणणार आहे. या फोनमध्ये केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर असेल.
हा फोन २०२६ मध्ये अधिकृतपणे लॉन्च होणार असून, ऑनरचे CEO ली जियान यांनी चीनमधील वुझेन शिखर परिषदेत याची घोषणा केली. कंपनीच्या मते, हा फोन AI च्या मदतीने काय शूट करायचे, कसे ट्रॅक करायचे आणि कोणत्या अँगल व्हिडिओ घ्यायचा हे स्वतः ठरवू शकेल. या फोनची खासियत म्हणजे यामध्ये फोल्डिंग आणि लिफ्टिंग मशिनरी असेल. मागील कॅमेरा भाग वेगळा होऊन तो ‘गिंबल’ (Gimbal) मध्ये बदलू शकेल म्हणजेच ३६० डिग्री फिरणारा, स्वयंचलित ट्रॅकिंग करणारा आणि 4K क्वालिटीमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करणारा कॅमेरा सिस्टम. हा फोन फक्त स्मार्टफोन नसून एक मिनी रोबोटप्रमाणे कार्य करेल.

